
चालू घडामोडी | रस्ते क्षेत्रात पर्यावरणपूरक क्रांती : भारत जगात पहिला

Eco-friendly Revolution in the Road Sector: India is the first in the world
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताने अलीकडे जागतिक पातळीवर कोणत्या क्षेत्रात ‘पहिला देश’ होण्याचा मान मिळवला आहे ?
1. ग्रीन हायड्रोजन उत्पादन
2. बायो-बिटुमेन चे व्यापारी उत्पादन
3. इलेक्ट्रिक महामार्ग
4. कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान
उत्तर : बायो-बिटुमेन (Bio-Bitumen) चे व्यापारी उत्पादन
बातमी काय ?
• भारताने रस्ते बांधकामासाठी बायो-बिटुमेन (Bio-Bitumen) चे व्यावसायिक उत्पादन सुरू करून जागतिक पातळीवर ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
• हा उपक्रम Council of Scientific and Industrial Research (CSIR) च्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आला आहे.
• ही नवकल्पना हरित पायाभूत सुविधा (Green Infrastructure) आणि शाश्वत महामार्गांच्या दिशेने भारताची मोठी झेप मानली जात आहे.
बायो-बिटुमेन म्हणजे काय ?
• बायो-बिटुमेन म्हणजे रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराचा (बिटुमेन) एक पर्यावरणपूरक पर्याय आहे.
• हा डांबर शेतीत उरलेल्या काडीकचऱ्यापासून, विशेषतः भाताच्या काड्यांपासून तयार केला जातो.
• रस्ते बनवताना जो डांबर दगड-खडी एकत्र धरून ठेवतो, त्या कामासाठी बायो-बिटुमेन वापरला जातो.
• हा पारंपरिक पेट्रोलियम डांबराचा पूर्ण पर्याय नसून, त्याच्या 20 ते 30 टक्के भागाऐवजी वापरता येतो.
• महत्त्वाचे म्हणजे, यामुळे रस्त्याची मजबुती किंवा टिकाऊपणा कमी होत नाही.
कोणत्या संस्था सहभागी आहेत ?
👉या प्रकल्पात खालील CSIR संस्थांचा महत्त्वाचा सहभाग आहे :
• CSIR-Central Road Research Institute (CSIR-CRRI), नवी दिल्ली
• CSIR-Indian Institute of Petroleum (CSIR-IIP), डेहराडून
बायो-बिटुमेनची मुख्य वैशिष्ट्ये कोणती ?
• बायो-बिटुमेन पारंपरिक डांबरात सहज मिसळता येतो, त्यामुळे रस्ते बांधण्याची पद्धत बदलावी लागत नाही.
• उन्हाळ्यात जास्त गरमी आणि हिवाळ्यात थंडी असतानाही तो स्थिर राहतो आणि लवकर खराब होत नाही.
• या डांबराचा वापर केलेले रस्ते तडे जाणे, खोल खड्डे पडणे किंवा पाणी शिरणे याला चांगला विरोध करतात.
• शेतातल्या टाकाऊ अवशेष वापरल्यामुळे ते जाळण्याचे प्रमाण कमी होते आणि हवा प्रदूषण घटते.
• बायो-बिटुमेनमुळे बाहेरून आयात करावा लागणारा डांबर कमी लागतो, त्यामुळे देशाचे पैसे वाचतात.
• हा डांबर भारतीय महामार्गांच्या निकषांनुसार तपासलेला आणि यशस्वी ठरलेला आहे.
• बायो-बिटुमेन पासून बनवलेला मेघालयातील NH-40 (Jorabat–Shillong Expressway) वर 100 मीटरचा प्रायोगिक रस्ता यशस्वी ठरला आहे.
बायो-बिटुमेन निर्मिती प्रक्रिया (Pyrolysis आधारित) :
• प्रथम कापणीनंतर उरलेल्या भाताच्या काड्या गोळा करून त्यांचे पेलेट्स तयार केले जातात.
• हे पेलेट्स ऑक्सिजन नसलेल्या वातावरणात उच्च तापमानावर तापवले जातात (Pyrolysis).
• या प्रक्रियेत बायो-ऑइल, ज्वलनशील वायू आणि बायो-चार निर्माण होतो.
• यातील बायो-ऑइल वेगळे करून पारंपरिक बिटुमेनमध्ये 20–30% प्रमाणात मिसळले जाते.
• त्यानंतर अंतिम उत्पादनावर भौतिक, रासायनिक व यांत्रिक चाचण्या घेऊन महामार्ग मानकांनुसार गुणवत्ता निश्चित केली जाते.

या उपक्रमाचे महत्त्व (Significance) :
• हा उपक्रम हरित व स्वच्छ महामार्ग धोरणाला बळ देतो.
• शेती अवशेषांचे मूल्यवर्धन करून शेती कचरा जाळण्याची समस्या सोडवतो.
• भारताला दरवर्षी आयात कराव्या लागणाऱ्या ₹25,000–30,000 कोटींच्या बिटुमेन आयातीवर बचत होऊ शकते.
• कार्बन उत्सर्जन कमी करून Climate Action Goals साध्य करण्यात मदत होते.
















_1769824977764.webp)


