
चालू घडामोडी | प्रवासी भारतीय दिवस

प्रवासी भारतीय दिवस
Pravasi Bharatiya Divas
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रवासी भारतीय दिवसा बद्दल योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
1. प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीला साजरी करतात.
2. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
3. वरील दोन्ही विधाने योग्य आहे.
4. वरील दोन्ही विधाने अयोग्य आहे.
उत्तर : वरील दोन्ही विधाने योग्य आहे
बातमी काय ?
• प्रवासी भारतीय दिवस (PBD) दोन वर्षातून एकदा 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
• 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
• 19 वी आवृत्ती 2027 मध्ये अपेक्षित आहे.
18 व्या प्रवासी भारतीय दिवसाची संकल्पना (थीम) काय आहे ?
• “विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान” ही 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाची संकल्पना आहे.
• “Diaspora's contribution to a Viksit Bharat”
प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ? आणि का ?
• देशाच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचे महत्त्व ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी साजरी करण्यात येतो.
प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीलाच का साजरी करतात ?
• 9 जानेवारी 1915 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले.
• त्यांच्या आगमनाच्या स्मरणार्थ प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीला साजरी करतात.

पहिला प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केव्हा करण्यात आले ?
• पहिल्या प्रवासी भारतीय दिवसाच्या आयोजन 9 जानेवारी 2003 मध्ये करण्यात आले.
• 2003 पासून 2015 पर्यंत या दिवसाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत होते.
• परंतु 2015 पासून, सुधारित स्वरूपात, प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन दर 2 वर्षांनी एकदा केले जाते.
• 17 वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 2023 मध्ये मध्य प्रदेशातील इंदोर येथे पार पडला.
• 18 वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 2025 मध्ये ओडिशाच्या भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता.
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार म्हणजे काय ?
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार कोणाला दिला जातो ?
Pravasi Bharatiya Samman Award
• अनिवासी भारतीय (Non-Resident Indian) किंवा भारतीय वंशाची व्यक्ती (Person of Indian Origin)
• त्याचप्रमाणे अनिवासी भारतीय किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तींनी स्थापन केलेल्या आणि चालवलेल्या संस्थांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देण्यात येतो.
• प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींद्वारे देण्यात येतो.














_1769824977764.webp)





