
चालू घडामोडी | आधार ‘उदय’ शुभंकर

Aadhaar Mascot ‘Udai’
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘उदय’ हा शुभंकर कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे ?
1. आधार क्रमांक देण्यासाठी
2. आधार सेवांची माहिती नागरिकांना सोप्या पद्धतीने देण्यासाठी
3. आधार प्रमाणीकरण सक्तीचे करण्यासाठी
4. आधारला कायदेशीर दर्जा देण्यासाठी
उत्तर : आधार सेवांची माहिती नागरिकांना सोप्या पद्धतीने देण्यासाठी
बातमी काय ?
• भारत सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (Unique Identification Authority of India - UIDAI) या संस्थेने ‘उदय’ (Udai) नावाचा आधारचा अधिकृत शुभंकर सुरू केला आहे.
‘उदय’ शुभंकर म्हणजे काय ?
• ‘उदय’ हा कोणतीही सेवा देणारा घटक नसून फक्त माहिती व जनजागृतीसाठीचा अधिकृत संवाद माध्यम आहे.
• ‘उदय’ हा नागरिक-केंद्रित संवाद सहाय्यक (Resident-Facing Communication Companion) म्हणजेच आधारचा अधिकृत शुभंकर आहे.
• तो आधारच्या क्लिष्ट प्रक्रियांना सोप्या आणि मैत्रीपूर्ण स्वरूपात मांडतो.
• हा शुभंकर आधारविषयक माहिती अधिक लोकाभिमुख, समजण्याजोगी आणि सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
‘उदय’ या शुभंकर चा उद्देश कोणता ?
• आधार अद्ययावत करणे
• प्रमाणीकरण
• ऑफलाईन पडताळणी
• निवडक माहिती सामायिकरण
• आधारचा जबाबदार वापर - या बाबी नागरिकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे हा आहे.
हा उपक्रम सुरू करण्याची गरज का निर्माण झाली ?
• आधार (Aadhaar) ही देशातील सर्वात मोठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (digital public infrastructure) आहे.
• तरीही अनेक नागरिकांना प्रक्रियांबाबत संभ्रम, चुकीची माहिती सेवा वापरातील चुका यांचा सामना करावा लागतो.
• ही माहितीतील दरी भरून काढण्यासाठी मानवी स्वरूपात संवाद साधणारा शुभंकर ही संकल्पना पुढे आली.
शासन व डिजिटल धोरणाच्या दृष्टीने महत्त्व :
• या उपक्रमामुळे आधारविषयी नागरिकांचा विश्वास वाढतो
• चुकीचा वापर कमी होतो सेवा वितरण अधिक प्रभावी होते
• तसेच, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांभोवती नागरिकांचा सहभाग (citizen engagement) वाढतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• आधार = भारताची सर्वात मोठी डिजिटल ओळख प्रणाली
• UIDAI = आधार व्यवस्थापनाची वैधानिक संस्था
• ‘उदय’ = आधारचा अधिकृत शुभंकर
• ‘उदय’ सुरू करणारी संस्था = UIDAI
• उद्देश = आधार माहिती लोकाभिमुख करणे
• स्वरूप = संवाद व जनजागृती (सेवा देणारा घटक नाही)
• महत्त्व = विश्वास, सहभाग, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा


















