
चालू घडामोडी 12, एप्रिल 2025 | 13,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेला लांडगा पुन्हा जिवंत झाला !! | De-Extinction of Dire Wolf

13,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेला लांडगा पुन्हा जिवंत झाला !!
De-Extinction of Dire Wolf
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कोणत्या देशाच्या कंपनीने डायर वूल्फ (dire wolf) या लांडग्यांच्या प्रजातीला पुनरुज्जीवित केले ?
1. अमेरिका
2. रशिया
3. चीन
4. फ्रान्स
उत्तर : अमेरिका
बातमी काय ?
• 13,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वूल्फ पुन्हा जिंवत करण्यात आले.
• 'गेम ऑफ थ्रोन्स' (Game of Thrones) या वेब सिरीजमध्ये डायर वूल्फ लांडगे दाखवले आहे.
कोणत्या कंपनीने डायर वूल्फ (Dire Wolf) या लांडग्यांच्या प्रजातीला पुनरुज्जीवित केले ?
• कोलोसल बायोसायन्सेस (Colossal Biosciences) या अमेरिकन कंपनीने 13,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वूल्फ (dire wolf) या लांडग्यांच्या प्रजातीला पुनरुज्जीवित केल्याचा दावा केला आहे.
• डायर वूल्फचा प्राचीन डीएनए (DNA) आणि जेनेटिक इंजिनियरिंगचा वापर करून या कंपनीने डायर वूल्फच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याची घोषणा केली आहे.
• या तीन पिल्लांपैकी दोन नर आणि एक मादी आहे.
डायर वुल्फ लांडग्याचे पुन्हा जिवंत कसा केला ?
• शास्त्रज्ञांनी सापडलेल्या 10 हजार वर्षे जुना दात आणि 72 हजार वर्षे जुन्या कवटीतून काढलेल्या DNA चा वापर केला गेला.
• कंपनीने CRISPR तंत्रज्ञानाचा वापर करून 14 जीन्समध्ये 20 बदल केले.
• सध्या जिवंत असणाऱ्या प्राण्यांमध्ये राखाडी रंगाचा लांडगा हा डायर वूल्फचा सगळ्यात जवळचा नातेवाईक आहे.
• अनुवंशिकदृष्ट्या या दोन्ही प्राण्यांमध्ये बऱ्याच समानता आहेत.
• त्यामुळे डायर वूल्फचे गुणधर्म दर्शविणाऱ्या डीएनएला लक्ष्य केलं आणि नंतर राखाडी लांडग्यांच्या पेशींमध्ये बदल केला.
• त्यानंतर आम्ही हुबेहूब तशाच पेशी तयार केल्या.
• या सगळ्या प्रक्रियेतून एक गर्भ तयार झाला.
• या गर्भाचं पाळीव कुत्र्यांच्या गर्भात रोपण करण्यात आलं.
• या मादी कुत्र्यांचा वापर सरोगेट म्हणून करण्यात आला.
• तीनही पिल्लं सिझेरियनचा वापर करून जन्माला घालण्यात आली.
डायर वुल्फ (Dire Wolf) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डायर वुल्फ (शास्त्रीय नाव : Aenocyon Dirus) ही एक महाकाय लांडग्याची प्रजाती होती जी सुमारे 13,000 वर्षांपूर्वी नामशेष झाली.
• ते आजच्या राखाडी लांडग्यापेक्षा 25% मोठे आणि अधिक शक्तिशाली होते.
• डायर वुल्फ हे 3.5 फूट उंच, 6 फूटांपेक्षा जास्त लांबीचे आणि 68 किलो वजनाचे असू शकतात.
• त्यांची खास वैशिष्ट्ये म्हणजे मजबूत जबडे, जाड केस आणि बर्फाळ हवामानात टिकून राहण्याची क्षमता.
• ही प्रजाती उत्तर अमेरिकेच्या जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी होती.
• हिमयुगाच्या शेवटी हवामान बदल, खाण्यासाठी शिकारीचा अभाव आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे ते नामशेष झाले.
de-Extinction म्हणजे काय ?
• CRISPR जीन एडिटिंग, क्लोनिंग किंवा बॅक-ब्रिडिंग यासारख्या जैवतंत्रज्ञानाचा वापर करून नामशेष झालेल्या प्रजातीला पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रिया म्हणजे de-Extinction.
