
चालू घडामोडी 11, एप्रिल 2025 | महात्मा ज्योतीबा फुले | Mahatma Jyotiba Phule

महात्मा ज्योतीबा फुले
Mahatma Jyotiba Phule
लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास- महाराष्ट्रातील समाजसुधारक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?
( सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती 2023, 2021, 2017.....)
1. 14 एप्रिल 1827
2. 14 एप्रिल 1828
3. 11 एप्रिल 1827
4. 18 एप्रिल 1827
उत्तर : 11 एप्रिल 1827
महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला ?
• महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्हातील कटगुण या ठिकाणी झाला.
• पूर्ण नाव : ज्योतिराव गोविंदराव फुले
• आईचे आणि वडिलांचे नाव : महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले होते तर आईचे नाव चिमनाबाई असे होते.
• मूळ आडनाव : महात्मा ज्योतिबांचे आजोबा शेवटच्या पेशव्यांच्या काळात फुलांचा व्यवसाय करीत ; त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे असे होते परंतु व्यवसायावरून त्यांचे फुले हेच आडनाव पडले.
• संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर यांच्या विचारांचा महात्मा फुलेंवर मोठा प्रभाव होता.
• राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचाही महात्मा फुलेंवर मोठा प्रभाव पडला.
महात्मा ज्योतीबा फुले यांचे कार्य :
• देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा फुले यांनी रोवली.
• त्यांनी 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.
• 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली
• तर 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत तिसरी शाळा काढली.
• 1863 मध्ये पुण्याच्या स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली.
• 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
• 1865 मध्ये केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्ह्यांचा संप तळेगाव ढमढेरे व ओतूर या गावी केला.
• 1882 मध्ये शिक्षणा संदर्भातील आलेल्या हंटर कमिशन पुढे साक्ष महात्मा ज्योतीबा फुले यांनी दिली.
• जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली आणि हंटर कमिशनला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे ही विनंती केली.
• 11 मे 1888 रोजी कोळीवाडा, मुंबई येथील जनतेने रावबहादुर वड्डेदार यांच्या हस्ते महात्मा ही पदवी बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
• छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असेल संबोधले.
• मृत्यू : 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
सत्यशोधक समाज बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
• स्थापना : 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
• घोषवाक्य : सर्व साक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी
• मूळ उद्दिष्ट : बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक समाजाचे मूळ उद्दिष्ट होते.
- मानवता, बुद्धीप्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे सत्यशोधक समाजाचे मूळ आधार स्तंभ आहेत.
- सत्यशोधक समाजाची प्रार्थना रविवारी होत असे.
- सत्यशोधक समाजातर्फे अंबालहरी हे वृत्तपत्र चालविली जात असे.
- सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह सीताराम अल्हाट आणि राधाबाई निंबकर यांचा झाला.
महात्मा ज्योतीबा फुले यांनी लिहिलेले महत्वाचे साहित्य :
• तृतीय रत्न
• ब्राह्मणांचे कसब
• शिवाजी महाराजांचा पोवाडा
• गुलामगिरी
• शेतकऱ्याचे असुड
• सार्वजनिक सत्यधर्म
• अस्पृश्याची कैफियत इत्यादी.

महात्मा ज्योतीबा फुले यांवर सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?
( MPSC ASO -2014 )
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. छत्रपती शाहू महाराज
3. महात्मा ज्योतिबा फुले
4. वी.रा. शिंदे
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
• छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असेल संबोधले.
प्रश्न ) खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारात सुरुवात केली ?
(MPSC - PSI 2016)
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. महात्मा ज्योतिबा फुले
3. श्रीमंत जयसिंगराव
4. गोदूताई कर्वे
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
प्रश्न ) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
( सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC )
1. आचार्य बाळशास्त्री जांभेकर
2. गोपाळ गणेश आगरकर
3. महात्मा ज्योतिबा फुले
4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
प्रश्न) ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी -------यांनी दिली.
(MPSC -PSI 2013, महाराष्ट्र पोलीस भरती)
1. सरकार
2. पुणेकर जनता
3. सातारकर जनता
4. मुंबईचे नागरिक
उत्तर : मुंबईचे नागरिक
• 11 मे 1888 रोजी कोळीवाडा, मुंबई येथील जनतेने रावबहादुर वड्डेदार यांच्या हस्ते महात्मा ही पदवी बहाल करून ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रश्न ) सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी _____ येथे मुलींची पहिली शाळा काढली.
(MPSC गट क , महाराष्ट्र पोलीस भरती नांदेड 2023 )
1. जेजुरी गड
2. शनिवार वाडा
3. भिडे वाडा
4. रायगड किल्ला
उत्तर : भिडे वाडा