
चालू घडामोडी 09, एप्रिल 2025 | आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय | International Criminal Court

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय
International Criminal Court
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच कोणत्या युरोपीय देशाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे (ICC) सदस्यत्व सोडण्याची घोषणा केली ?
1. हंगेरी
2. पोलंड
3. जर्मनी
4. फ्रान्स
उत्तर : हंगेरी
बातमी काय ?
• हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन (Viktor Orbán) यांनी घोषणा केली की त्यांचा देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून (ICC) माघार घेत आहे.
• त्यामुळे हंगेरी आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा सदस्य देश नसेल.
• आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा हंगेरी हा पहिला युरोपीयन देश आहे.
• पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन त्यांचे इस्रायली समकक्ष बेंजामिन नेतान्याहू यांना भेटण्यासाठी आले तेव्हा ही घोषणा करण्यात आली.
• आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालया बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजे International Criminal Court (ICC)
• 1998 च्या रोम कायद्याच्या तरतुदींनुसार 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
• हे एक कायमस्वरूपी, स्वतंत्र आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
• सर्वात गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी, त्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी आणि जगातील काही सर्वात वाईट गुन्ह्यांमध्ये दोषी असलेल्यांना शिक्षा देण्यासाठी हे न्यायालय स्थापन केले गेले.
• आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हे 4 गंभीर गुन्ह्यांसाठी व्यक्तींवर खटला चालवते :
1. नरसंहार (Genocide)
2. युद्ध गुन्हे (War Crimes)
3. मानवतेविरुद्धचे गुन्हे (Crimes Against Humanity)
4. आक्रमकतेचे गुन्हे (Crime of Aggression)
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे ?
(RRB NTPC 2020)
• नेदरलँड्स (Netherlands) देशातील द हेग (The Hague) या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालया वर गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे :
• आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (International Criminal Court) हे संयुक्त राष्ट्र संघाचा भाग नाही.
• संयुक्त राष्ट्र संघाचा भाग असलेले न्यायालय International Court of Justice हे आहे.
• International Criminal Court आणि International Court of Justice वेगवेगळे न्यायालय आहे.
भारत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा सदस्य देश आहे का ?
• भारत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा सदस्य देश नाही.
• भारताने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम कायद्यावर (Rome Statute) स्वाक्षरी केलेली नाही किंवा त्याला मान्यता दिलेली नाही.
• भारताबरोबरच अमेरिका, रशिया, चीन हे देखील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे सदस्य देश नाही.
International Criminal Court आणि International Court of Justice मध्ये काय फरक आहे ?
• ICC : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय नरसंहार, युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी व्यक्तींवर खटला चालवते.
• ICJ : तर International Court of Justice देशांमधील कायदेशीर वाद मिटवते आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर मुद्द्यांवर सल्ला देते.