
चालू घडामोडी 07, एप्रिल 2025 | 6वी BIMSTEC शिखर परिषद | 6th BIMSTEC Summit

6 वी बिमस्टेक शिखर परिषद
6th BIMSTEC Summit
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 6 वी बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?
1. भारत
2. बांग्लादेश
3. थायलंड
4. म्यानमार
उत्तर : थायलंड
बातमी काय ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी झाले.
6 व्या बिमस्टेक शिखर परिषदे बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• थायलंडने बँकॉकमध्ये सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.
• शिखर परिषदेने शिखर घोषणापत्र आणि बँकॉक व्हिजन 2030 स्वीकारले.
• ज्यामध्ये आर्थिक एकात्मता, जागतिक आव्हानांना तोंड देण्याची लवचिकता आणि पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानातील सहकार्यावर लक्ष केंद्रित करून प्रादेशिक समृद्धीसाठी एक रोडमॅप तयार करण्यात आला.
6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत भारताने मांडलेल्या उपक्रमांपैकी परीक्षेसाठी महत्त्वाचे उपक्रम :
• भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कनेक्टिव्हिटी, व्यापार, आपत्ती व्यवस्थापन आणि तांत्रिक एकात्मतेद्वारे प्रादेशिक सहकार्य वाढविण्यासाठी 21 कलमी कृती योजना प्रस्तावित केली.
- आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसनात सहकार्य करण्यासाठी भारतात बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्राची स्थापना.
- या वर्षी बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांमध्ये चौथा संयुक्त सराव भारतात होणार.
- "बोधी" अर्थात "मनुष्यबळ संरचना संघटित विकासासाठी बिमस्टेक" (BODHI : BIMSTEC for Organised Development of Human resource Infrastructure) उपक्रम या अंतर्गत दरवर्षी बिमस्टेक देशांमधील 300 तरुणांना भारतात प्रशिक्षण दिले जाणार.
- या वर्षी भारतात 'बिमस्टेक ॲथलेटिक्स मीट' आयोजित करणे.
- 2027 मध्ये पहिल्या बिमस्टेक क्रीडा स्पर्धा आयोजित करणे.
- गृहमंत्री यंत्रणेची पहिली बैठक भारतात आयोजित करणे.
- UPI आणि बिमस्टेक प्रदेशातील पेमेंट सिस्टममधील संपर्क.
6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले ?
• 6 वी बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन थायलंड देशाने केले.
6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेची संकल्पना (थीम) कोणती ?
• "समृद्ध, लवचिक आणि खुले बिमस्टेक" ( Prosperous, Resilient, and Open BIMSTEC) ही 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेची संकल्पना आहे.
• ही संकल्पना BIMSTEC सदस्य राष्ट्रांमध्ये प्रादेशिक सहकार्य मजबूत करणे आणि प्रमुख आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करते.
बिमस्टेक म्हणजे काय ?
• BIMSTEC चा फूल फॅार्म Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation.
• बिमस्टेक ही बंगालच्या उपसागराच्या परिसरातील देशांची विविध क्षेत्रांतील आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकार्य संघटना आहे.
• दक्षिण आणि अग्नेय आशियातील बंगालच्या उपसागराच्या परिसरात असलेल्या देशांमध्ये आर्थिक व तंत्रज्ञानविषयक सहकार्य वाढविणे, हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
• आर्थिक सहकार्य या संज्ञेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, पर्यटन, मनुष्यबळ विकास, शेती, मत्स्योद्योग, वाहतूक व दळणवळण, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग आदी विषयांचा समावेश आहे.
बिमस्टेक संघटनेत किती सदस्य देश आहेत आणि कोणते ?
How many countries are in the BIMSTEC ?
• बांग्लादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ हे 7 देश या संघटनेचे सदस्य देश आहे.

बिमस्टेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
Where is the Headquarters of BIMSTEC?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती, SSC, CGL 2022)
• बिमस्टेक संघटनेचे मुख्यालय बांग्लादेशातील ढाका येथे आहे.