
चालू घडामोडी 08, एप्रिल 2025 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान | PM Shri Narendra Modi receives the highest Sri Lankan Honour for Foreign Leaders

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान
PM Shri Narendra Modi receives the highest Sri Lankan Honour for Foreign Leaders
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा कोणता नागरी सन्मान प्रदान करण्यात आला ?
1. श्रीलंका रत्न पुरस्कार
2. श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार
3. लंका सेवारत्न पुरस्कार
4. श्रीलंका गौरव पुरस्कार
उत्तर : श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार (Sri Lanka Mitra Vibhushana)

पुरस्काराबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “श्रीलंका मित्र विभूषण” पुरस्कार प्रदान केला.
• हा पुरस्कार श्रीलंकेचा परदेशी नेत्यांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
• या पुरस्कारात एक प्रशस्तिपत्र आणि 9 श्रीलंकेच्या रत्नांनी जडवलेले पदक असते.
• “श्रीलंका मित्र विभूषण” पुरस्काराची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली.
• या पुरस्काराची रचना धर्मचक्र, पुण्य कलश आणि नऊ रत्नांनी सजवलेले कमळ या स्वरूपात सांस्कृतिक आणि बौद्ध वारसा प्रतिबिंबित करते.
• हा पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते आहेत.
• पंतप्रधान नरेंद्र मोदींना, परदेशी देशाने दिलेला हा 22 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “श्रीलंका मित्र विभूषण” हा पुरस्कार का देण्यात आला ?
• भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्री दृढ करण्यासाठी, आणि दोन्ही देशांतील सांस्कृतिक वारशाला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल त्यांना “श्रीलंका मित्र विभूषण” हा सन्मान देण्यात आला.