
चालू घडामोडी 08, एप्रिल 2025 | फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार - सुदर्शन पटनायक | Fred Darrington Award

फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार
Fred Darrington Award
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कला आणि संस्कृतीतील उत्कृष्टतेसाठी 2025 चा प्रतिष्ठित फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
1. श्री जितेंद्र हरिपाल
2. श्री सुदर्शन पटनायक
3. श्री नितीश भारती
4. श्री नारायण साहू
उत्तर : सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik)
बातमी काय ?
प्रसिद्ध भारतीय वाळूशिल्पकार श्री सुदर्शन पटनायक यांनी 2025 चा फ्रेड डॅरिंग्टन सँड आर्ट पुरस्कार (Fred Darrington Sand Art Award) जिंकला.
2025 चा फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्री सुदर्शन पटनायक हे हा प्रतिष्ठित फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
• श्री सुदर्शन पटनायक यांना त्यांच्या 10 फूट उंच वाळूच्या गणेशमूर्तीसाठी हा पुरस्कार मिळाला.
• त्यांनी भगवान गणेशांच्या शिल्पातून " विश्व शांतीचा" संदेश जगाला दिला.
• इंग्लंडमधील डोरसेट येथे झालेल्या सँडवर्ल्ड 2025 आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवात हा सन्मान श्री सुदर्शन पटनायक यांना प्रदान करण्यात आला.
• यावर्षी हा पुरस्कार विशेष महत्त्वाचा आहे कारण हा पुरस्कार प्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार फ्रेड डॅरिंग्टन यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त साजरा केला गेला.

श्री सुदर्शन पटनायक यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्री सुदर्शन पटनायक यांचा जन्म 1977 मध्ये ओडिशा राज्याच्या पूरी जिल्हात झाला.
• श्री सुदर्शन पटनायक हे प्रसिद्ध वाळूशिल्पकार (Sand Sculptor) आहेत.
• त्यांनी शेकडो कलाकृती तयार केल्या आहेत,
• त्यापैकी काहींची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली आहे.
• ते मंदिरे, देवता, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सारख्या व्यक्तींच्या महाकाय शिल्पांसाठी
• तसेच पर्यावरणीय समस्या आणि इतर महत्त्वाच्या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या कलेचा वापर करण्यासाठी ओळखले जातात.
• 2014 मध्ये, भारत सरकारने श्री सुदर्शन पटनायक त्यांच्या कलाकृतींसाठी पद्मश्री पुरस्कार (भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार) देऊन सन्मानित केले.