
चालू घडामोडी 11, एप्रिल 2025 | तामिळनाडूत सापडला ऐतिहासिक शिलालेख | Chola-era stone inscription found in Tamil Nadu

तामिळनाडूत सापडला ऐतिहासिक शिलालेख
Chola-era stone inscription found in Tamil Nadu
Subject : GS - इतिहास - मध्ययुगीन भारतीय इतिहास : चोल साम्राज्य
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच तामिळनाडूतील मेलावलावू येथील सोमगिरी टेकड्यांवर चोल काळातील एक ऐतिहासिक शिलालेख सापडला. हा सापडलेला नवीन शिलालेख खालील पैकी कोणत्या चोल राजाशी संबंधित आहे.
1. विजयालय चोल
2. आदित्य पहिला चोल
3. राजराजा चोल
4. राजेंद्र पहिला चोल
उत्तर : राजराजा चोल
बातमी काय ?
• तामिळनाडू राज्यात चोल काळातील एक ऐतिहासिक शिलालेख सापडला.
शिलालेखावर काय सापडले ?
• तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील मेलावलावू येथील सोमगिरी टेकड्यांवर चोल काळातील एक ऐतिहासिक शिलालेख सापडला आहे.
• हा शिलालेख सुमारे ई.स.1000 चा असावा, असे सांगितले आहे.
• हा सापडलेला नवीन शिलालेख राजराजा चोलाशी संबंधित आहे.
• या शिलालेखात पांड्य प्रदेशातील राजराज चोलच्या कारकिर्दीचे वर्णन आहे.
• शिलालेख पांड्या प्रदेशात राजा राजराज चोलाच प्रभावाचे प्रतीक आहे.
• विरनारण पल्लवरायण नावाच्या लष्करी सेनापतीने हा परिसर कसा जिंकला आणि येथे राज्य कसे केले याबद्दल सांगितले आहे.
• तसेच, मलाइप्पा सांबू नावाच्या एका व्यक्तीचेही वर्णन आहे, ज्याने मंदिर बांधलेल्या कड्यापर्यंत पोहोचण्यासाठी खडकावर पायऱ्या खोदल्या होत्या.
चोल राजवंशा बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• चोल हा प्राचीन भारतातील एक राजवंश होता.
• 9 व्या ते 13 व्या शतकादरम्यान तमिळ चोल शासकांनी दक्षिण भारत आणि इतर लगतच्या देशांमध्ये एक अत्यंत शक्तिशाली हिंदू साम्राज्य निर्माण केले.
• चोल साम्राज्य भौगोलिकदृष्ट्या आत्ताच्या तामिळनाडूमध्ये पेन्नार आणि वेलार नद्यांच्या दरम्यान वसलेले होते.
• या मोक्याच्या जागेमुळे चोलांना अत्यंत महत्त्वाचा असलेल्या सुपीक आणि संसाधनांनी समृद्ध प्रदेशावर नियंत्रण ठेवता आले.
चोल साम्राज्याचे प्रमुख सम्राट :
विजयालय चोल (Vijayalaya Chola) : 850 ते 871
चोल साम्राज्याची स्थापना कोणी आणि केव्हा केली ?
• चोल साम्राज्याची स्थापना विजयालय चोल यांनी केली.
• चोल साम्राज्याचे संस्थापक विजयालय चोल (Vijayalaya Chola) यांनी 9 व्या शतकात इसवी सन 850 च्या सुमारास मुथरायर (Mutharaiyar) शासकांकडून तंजावर (Thanjavur) शहर काबीज करून चोल राजवंशाची स्थापना केली.
आदित्य पहिला (Aditya I) : 871 ते 907
• आदित्य पहिला त्याचे वडील विजयालय यांच्यानंतर गादीवर बसला आणि त्याने पल्लवांचा पराभव करून चोल प्रदेशाचा लक्षणीय विस्तार केला.
• त्याने पल्लव प्रदेश आपल्या ताब्यात घेतले, त्यांचा प्रभाव संपवला आणि दक्षिण भारतात चोल वर्चस्वाचा पाया रचला.
राजराजा पहिला (Rajaraja I) : 985 ते 1014
• राजराजा पहिला हा चोल साम्राज्यातील एक महान शासक होता.
• त्याने साम्राज्याच्या सीमांचा लक्षणीय विस्तार केला, दक्षिण भारत, श्रीलंका आणि मालदीवमधील प्रदेश जिंकले आणि चोल साम्राज्याला सागरी शक्ती म्हणून स्थापित केले.
• 1010 मध्ये, राज राजा चोल यांनी तंजावरमध्ये भगवान शिव यांना समर्पित बृहदीश्वर मंदिर (Brihadeeswara temple) बांधले.
राजराजा पहिला यांनी कोणती पदवी (Titles) धारण केली होती ?
• पांड्यांच्या पराभवानंतर राजराजा पहिला यांनी पांड्य कुलशानी (Pandya Kulashani) ही पदवी धारण केली, ज्याचा अर्थ पांड्यांच्या वंशासाठी वीज असा होतो.
• राजराज चोल यांनी मुम्मुदी चोल (Mummudi Chola) ही पदवी देखील धारण केली, ज्याचा अर्थ तीन मुकुट धारण करणारा चोल असा होतो.
राजेंद्र पहिला (Rajendra I) : 1012 ते 1044
राजेंद्र पहिला हा कोणत्या चोल राजाचा मुलगा होता ?
(SSC HSC 2022)
• राजेंद्र पहिला हा राजराजा पहिला या चोल राजाचा मुलगा होता.
• त्याच्या वडिलांनी सुरू केलेले श्रीलंकेवरील विजय पूर्ण करून राजेंद्र पहिला याने आपले साम्राज्य वाढवले.
कोणत्या चोल शासकाला 'गंगेचा विजेता' असे म्हटले जात असे ?
(SSC CHSL 2020)
• राजेंद्र पहिला या चोल शासकाला 'गंगेचा विजेता' असे म्हटले जात असे
• चोल राजवंशाचा राजेंद्र पहिला राजाने बंगालचा महिपाल पहिला राजाचा पराभव केला.
• राजेंद्र पहिलाचा विजय हा चोल साम्राज्याच्या उत्तर भारतात विस्तारातील एक महत्त्वाची घटना होती.
• त्याच्या विजयाच्या सन्मानार्थ राजेंद्र पहिला यांनी गंगाईकोंडचोलापुरम (Gangaikondacholapuram) शहराची स्थापना केली.
• यशस्वी उत्तर-भारतीय मोहिमेचे स्मरण करण्यासाठी राजेंद्र पहिला याने "गंगाईकोंडाचोला" (Gangaikondachola) ही पदवी धारण केली.
• राजेंद्र पहिला राजाने आपल्या साम्राज्यात अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, यासाठी त्याला पंडित चोल (Pandita Chola) ही पदवी मिळाली.
• राजेंद्र पहिला यांच्या कारकिर्दीत चोल साम्राज्याच्या नौदल वर्चस्वाचा आणि प्रादेशिक विस्ताराचा कळस गाठला गेला.
• त्याने आपल्या आरमाराच्या साहाय्याने जावा, सुमात्रा, मलाया द्वीपकल्प यांवर स्वारी करून तत्कालीन शैलेंद्रांच्या साम्राज्याचा विध्वंस केला.
• अशा रीतीने तो उत्तरेस गंगेपासून दक्षिणेत श्रीलंकेपर्यंत आणि पूर्वेस मलाया द्वीपकल्पापर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा अधिपती झाला.
