
चालू घडामोडी 10, एप्रिल 2025 | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'सिटी की ऑफ ऑनर' पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'सिटी की ऑफ ऑनर' पुरस्कार
President of India, Smt Droupadi Murmu received the ‘City Key of Honour’
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बन शहराचा 'सिटी की ऑफ ऑनर' देऊन सन्मानित करण्यात आले, तर हा पुरस्कार त्यांना कोणत्या देशाने दिला ?
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. पोर्तुगाल
4. जर्मनी
उत्तर : पोर्तुगाल (Portugal)
बातमी काय ?
• पोर्तुगालमधील लिस्बनच्या सिटी हॉलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बनच्या महापौरांकडून लिस्बन शहराचा 'सिटी की ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला.
'सिटी की ऑफ ऑनर' पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• पोर्तुगालची राजधानी लिस्बन (Lisbon) येथे झालेल्या एका विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'सिटी की ऑफ ऑनर' (City Key of Honour) प्रदान करण्यात आले.
• हा सन्मान त्यांना लिस्बनच्या महापौरांनी दिला, जो लिस्बन नगरपालिकेने दिला जाणारा एक उच्च नागरी सन्मान आहे.
• 'सिटी की ऑफ ऑनर' या पुरस्काराचा उद्देश शहराच्या वतीने एखाद्या प्रतिष्ठित परदेशी पाहुण्याला किंवा प्रतिष्ठित व्यक्तीला आदर आणि आतिथ्य दाखवणे आहे.
• 2025 हे वर्ष भारत-पोर्तुगाल राजनैतिक संबंधांच्या 50 वे वर्ष असल्याने हा दौरा महत्त्वाचा आहे.
भारत आणि पोर्तुगाल संबंधांचा इतिहास :
• भारत-पोर्तुगाल संबंध 1498 मध्ये वास्को द गामाच्या कालिकतमध्ये आगमनाने सुरू झाले.
• 1961 रोजी ऑपरेशन विजय अंतर्गत भारतीय लष्करी कारवाईने गोवा मुक्त केला आणि 450 वर्षांहून अधिक काळ असणाऱ्या पोर्तुगीज राजवटीचा अंत झाला.
• भारत आणि पोर्तुगाल मध्ये तणावपूर्ण संबंध होते.
• पुढे भारत आणि पोर्तुगाल यांनी अखेर 1974 मध्ये
गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली आणि संबंधित बाबींवर भारताच्या सार्वभौमत्वाला मान्यता देण्यासाठी एक करार केला.
• हा करार 1975 मध्ये अंमलात आला.
पोर्तुगाल देशाबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• पोर्तुगाल हा पश्चिम युरोपमधील एक देश आहे.
• पोर्तूगाल देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश आहे,
• तर दक्षिणेला व पश्चिमेला उत्तर अटलांटिक महासागर आहे.
• पोर्तूगाल देशाची सीमा फक्त एकाच देशाला लागते, तो आहे स्पेन.
• राजधानी : लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.