
चालू घडामोडी 09, एप्रिल 2025 | 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिम ? | Samudra Pradakshina

'समुद्र प्रदक्षिणा' मोहिम ?
Samudra Pradakshina
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिम सुरू झाली. त्याबद्दल योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) ही मुंबई-सेशेल्स-मुंबई अशी सागरी परिक्रमा आहे.
ब) ही फक्त महिलांची सागरी मोहिम आहे.
पर्याय :
1. फक्त अ विधान योग्य
2. फक्त ब विधान योग्य
3. अ आणि ब दोन्ही विधाने योग्य
4. अ आणि ब दोन्ही विधाने अयोग्य
उत्तर : अ आणि ब दोन्ही विधाने योग्य
बातमी काय ?
• 'अलिकडेच महिलांच्या 'समुद्र प्रदक्षिणा' या मुंबई-सेशेल्स-मुंबई अशा सागरी परिक्रमा मोहिमेचा प्रारंभ झाला.

'समुद्र प्रदक्षिणा' मोहिम काय ?
• 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिम ही भारतीय सैन्य दलांतील महिलांची सागरी परिक्रमा आहे.
• या मोहिमेअंतर्गत आयएएसव्ही त्रिवेणी (IASV Triveni) जहाज मुंबई ते सेशेल्स आणि पुन्हा मुंबईला परत असा 4000 सागरी मैलांचा 55 दिवसांचा आव्हानात्मक प्रवास करणार आहे.
• 'समुद्र प्रदक्षिणा' मोहिमेत भारतीय सैन्य दल, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलातल्या 12 महिला सदस्यांचा समावेश आहे.
• या सर्व जणींनी सागरी जलपर्यटनाचे दोन वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.
• या सर्व महिला अधिकारी, समुद्रातील धोकादायक जलप्रवास करून त्यांच्यातील लवचिकपणा, धैर्य आणि निर्धाराने दर्शन घडवतील.
'समुद्र प्रदक्षिणा' मोहिमेचे उद्दिष्ट कोणते ?
• सागरी उपक्रमांमध्ये लिंगभाव समानतेला (स्त्री- पुरूष समानतेला) चालना देणे आणि सागरी कौशल्ये सुधारणे हे या मोहिमेचा उद्दिष्ट आहे.
'समुद्र प्रदक्षिणा' मोहिम महत्त्वाची का आहे ?
• 2026 या वर्षासाठीही अशाच प्रकारच्या महत्त्वाकांक्षी सागरी परिक्रमा मोहिमांचे नियोजन केले असून, त्या दिशेनेच ही मोहीम पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आखण्यात आली आहे.
• या मोहिमेतून नारी शक्तीची क्षमता अधोरेखित झाली आहे.
• या मोहिमेच्या माध्यमातून सशस्त्र दलातील महिलांच्या सक्षमीकरणाची प्रचिती येईल.
• ही मोहीम अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार्या राणी वेलू नचियार, राणी दुर्गावती आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या भारताच्या महान वीरांगनाना आदरांजलीही अर्पण करणारी मोहीम असणार आहे.