
चालू घडामोडी 09, एप्रिल 2025 | RBI च्या नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण ?

RBI च्या नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण ?
Who is the new Deputy Governor of Reserve Bank of India ?
Subject : GS - नियुक्ती, अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून खालील पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1. डॉ. पूनम गुप्ता
2. के.जे. उदेशी
3. देवकी जैन
4. डॉ. गीता गोपीनाथ
उत्तर : डॉ. पूनम गुप्ता
बातमी काय ?
• भारत सरकारने डॉ. पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली.
• डॉ. पूनम गुप्ता यांची नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
• डॉ. पूनम गुप्ता या डॉ. मायकल पात्रा यांची जागा घेतील.

डॉ. पूनम गुप्ता यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• डॉ. पूनम गुप्ता यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) आणि जागतिक बँकेतही (World Bank) काम केले आहे.
• त्या प्रतिष्ठित National Council of Applied Economic Research (NCAER) प्रमुखपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
• डॉ. पूनम गुप्ता या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या आहेत.
• 16 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या सदस्या आहेत.
डॉ. पूनम गुप्ता या RBI च्या कितव्या महिला डेप्युटी गव्हर्नर बनल्या ?
• डॉ. पूनम गुप्ता या RBI च्या चौथ्या महिला डेप्युटी गव्हर्नर बनल्या.
आजपर्यंत झालेल्या RBI च्या महिला डेप्युटी गव्हर्नर
1. के.जे. उदेशी : KJ Udeshi (2003-2005) : RBI च्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर
2. श्यामला गोपीनाथ : Shyamala Gopinath (2004-2009)
3. उषा थोरात : Usha Thorat (2005-2010)
4. डॉ. पूनम गुप्ता : Dr. Poonam Gupta (2025 - विद्यमान)
RBI बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली.
• भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 1 जानेवारी 1949 रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण (Nationalised) करण्यात आले.
• भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.
• RBI भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (Ministry of Finance) अंतर्गत काम करते.
• सर सी. डी. देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते.
RBI ची मुख्य उद्दिष्टे कोणती ?
• रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ही देशाची मध्यवर्ती बँक आहे.
• बँकिंग प्रणाली नियंत्रित करण्यासाठी, भारतीय रुपया जारी करण्यासाठी, महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता राखणे ही RBI ची काही मुख्य उद्दिष्टे आहेत.
RBI गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर :
• RBI चे 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात.
RBI चे वर्तमान गव्हर्नर कोण ?
• श्री. संजय मल्होत्रा (Shri. Sanjay Malhotra)
RBI चे वर्तमान डेप्युटी गव्हर्नर कोण ?
(एप्रिल 2025 च्या माहिती नुसार)
1. श्री. एम. राजेश्वर राव (Shri M. R. Rao)
2. श्री. टी. रबी शंकर (Shri T. Rabi Sankar)
3. श्री. स्वामीनाथन जानकीरमन (Shri Swaminathan J)
4. डॉ. पूनम गुप्ता (Dr. Poonam Gupta)
