
चालू घडामोडी 10, एप्रिल 2025 | जागतिक होमिओपॅथी दिन | World Homoeopathy Day

जागतिक होमिओपॅथी दिन
World Homoeopathy Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन केव्हा साजरी करतात ?
1. 26 फेब्रुवारी
2. 20 मार्च
3. 10 एप्रिल
4. 24 एप्रिल
उत्तर : 10 एप्रिल
जागतिक होमिओपॅथी दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• जगभरात दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन साजरी करतात.
• 10 एप्रिल रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन (Dr. Samuel Hahnemann) यांचा जन्म झाला.
• त्यांचा जन्मदिवस हा जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक होमिओपॅथी दिन 2025 चे उद्दिष्ट कोणते ?
होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीत होणाऱ्या संशोधनातील प्रगती, त्याचे व्यावहारिक उपयोग आणि आरोग्यसेवा तसेच उद्योगांतील होमिओपॅथीच्या वाढत्या परिणामांचा लाभ जागतिक स्तरावर सर्वांना मिळावा, हे जागतिक होमिओपॅथी दिन 2025 चे उद्दिष्ट आहे.
होमिओपॅथिक म्हणजे काय ?
• होमिओपॅथी (Homeopathy) हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे, होमिओज् (Homois) म्हणजे सारखा आणि पॅथोज् (Pathos) म्हणजे पीडित.
• होमिओपॅथी पद्धतीला ‘समचिकित्सा पद्धती’ असेही म्हणतात.
• या उपचारपद्धतीचे सूत्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ (Similia Similibus Curentur) म्हणजेच ‘काट्याने काटा काढणे’ हे आहे.
• होमिओपॅथिकनुसार, शरीरात स्वतःला बरे करण्याची क्षमता असते.
• होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली आहे.
• होमिओपॅथिक औषध पद्धतीच्या तत्त्वानुसार, होमिओपॅथिक औषधे शरीराची स्व-उपचार क्षमता वाढवतात.
• यामध्ये, रोगाची लक्षणे शरीराकडून पुन्हा निरोगी होण्यासाठी मिळालेली प्रतिक्रिया मानली जातात.
• होमिओपॅथी रुग्णाची जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.
• ही पद्धत कोणत्याही दुष्परिणामांशिवाय उपचार मानली जाते.
• होमिओपॅथिक औषधे प्राणी, वनस्पती, खनिज आणि इतर नैसर्गिक पदार्थांच्या अवशेषांपासून तयार केली जातात.
डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
Dr. Samuel Hahnemann
• डॉ. सॅम्युअल हॅनिमन हे जर्मन वैद्य आणि रसायनशास्त्रज्ञ होते.
• त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनी मध्ये झाला.
• डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी होमिओपॅथीचा सिद्धांत विकसित केला आणि या पद्धतीचा प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले.
• डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांना होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीचे जनक मानले जाते.
• डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या कार्याचा स न्मान करण्यासाठी दरवर्षी त्यांचा जन्मदिवस 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
