
चालू घडामोडी | जागतिक रक्तदाता दिन
World Blood Donor Day
📚 Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - शास्त्रज्ञ आणि शोध
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो ?
- 5 जून
- 8 जून
- 10 जून
- 14 जून
उत्तर : 14 जून
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.
🤔 जागतिक रक्तदाता दिन केव्हा आणि का साजरी केला जातो ?
• दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.
• हा दिवस स्वेच्छेने आणि विनाशुल्क रक्तदात्यांसाठी समर्पित आहे जे त्यांच्या रक्तदानाद्वारे असंख्य जीव वाचवतात.
• या दिवसाचा मुख्य उद्देश रक्तदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि स्वयंप्रेरणेने रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान करणे हा आहे.
• या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.
🧐 ‘जागतिक रक्तदाता दिन' कोणाच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
• प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लँडस्टाइनर (Karl Landsteiner) यांच्या सन्मानार्थ 14 जून हा त्यांचा जन्मदिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
• डॉ. कार्ल लँडस्टाइनर यांचा जन्म 14 जून 1868 रोजी झाला.
• डॉ. कार्ल लँडस्टाइनर यांनी मानवी रक्तातील ऍग्ग्लूटिनिनच्या उपस्थितीच्या आधारावर रक्त पेशींचे A, B आणि O गटांमध्ये वर्गीकरण केले.
• त्यांच्या या क्रांतिकारी शोधामुळेच आधुनिक वैद्यकीय शास्त्रात एका शरीरातून दुसऱ्या शरीरात सुरक्षित रक्त संक्रमण (Blood Transfusion) करणे शक्य झाले आणि लाखो लोकांचे प्राण वाचले.
• त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानासाठी डॉ. कार्ल लँडस्टाइनर यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.

🤔 पहिला जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा करण्यात आला ?
• जागतिक आरोग्य संघटनेने (World Health organisation) 14 जून 2004 रोजी प्रथमच जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला, आणि तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
🧐 2026 या वर्षीच्या जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना (थीम) कोणती ?
• "मानवतेचा एक थेंब. रक्तदान करा. जीवन वाचवा." ("One Drop of Humanity. Give Blood. Save Lives.") ही 2026 या वर्षीच्या जागतिक रक्तदाता दिनाची थीम आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : World Blood Donor Day
• जागतिक रक्तदाता दिन → 14 जून
• सन्मानार्थ → नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लँडस्टेनर
• डॉ. कार्ल लँडस्टाइनर यांचा जन्म → 14 जून 1868
• पहिल्यांदा साजरा → 14 जून 2004 रोजी (जागतिक आरोग्य संघटना - WHO द्वारे सुरुवात)
• 2026 ची संकल्पना (Theme) → "मानवतेचा एक थेंब. रक्तदान करा. जीवन वाचवा." ("One Drop of Humanity. Give Blood. Save Lives.")






















