
चालू घडामोडी | पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक विक्रम
Prime Minister Shri Narendra Modi's Historic Record
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) लोकशाही पद्धतीने सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले सरकारचे प्रमुख ठरलेले श्री. नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे 'बिगर-काँग्रेस' (Non-Congress) पंतप्रधान आहेत ज्यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे ?
1. पहिले
2. दुसरे
3. तिसरे
4. चौथे
उत्तर : पहिले
📰 बातमी काय ?
• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी भारतात सर्वाधिक काळ 'सलग लोकशाही पद्धतीने निवडून आलेले' (Longest Continuously Serving Democratically Elected) पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक विक्रम रचला आहे.
⏳ 4,399 दिवसांचा टप्पा -
• 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, त्यांनी 10 जून 2026 पर्यंत पदावर सलग 4,399 दिवस पूर्ण केले आहेत.
• यासह त्यांनी भारतातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ अखंड राहण्याचा विक्रम केला आहे.

⏳ कालावधी -
वर्ष 2026 मध्ये त्यांनी केंद्रातील सत्ता प्रशासनाची 12 वर्षे पूर्ण केली आहेत.
• स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले श्री. नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असून, सर्वाधिक काळ सेवा देणारे पहिले बिगर-काँग्रेस पंतप्रधान ठरले आहेत.
🧐 इतर पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यकाळाचा संदर्भ :
• भारताच्या इतिहासामध्ये दीर्घकाळ सलग सत्ता हाताळणाऱ्या तीन प्रमुख पंतप्रधानांची तुलनात्मक आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
1) नरेंद्र मोदी (सध्याचा विक्रम) → सलग 3 कार्यकाळ (26 मे 2014 ते वर्तमान). जून 2026 पर्यंत 4,399 दिवस सलग लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकारचे प्रमुख.
2) पंडित जवाहरलाल नेहरू → पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर (13 मे 1952 ते 27 मे 1964) सलग 4,398 दिवस पंतप्रधान.
विशेष नोंद - नेहरूंचा एकूण कार्यकाळ 6,131 दिवसांचा आहे, परंतु त्यात 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या अंतरिम (Interim), म्हणजेच गैर-निर्वाचित प्रशासनाचाही समावेश आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने 'निवडून आल्यानंतरचा' सलग कार्यकाळ 4,398 दिवसांचा होता.
3) इंदिरा गांधी → पहिल्या टप्प्यातील अखंड राजवट (24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977) एकूण 4,077 दिवस सलग कार्यकाळ. (त्यानंतर 1980 ते 1984 या काळात त्यांनी दुसऱ्यांदा स्वतंत्र कार्यकाळ भूषवला).

✍️ या दीर्घ कार्यकाळाचे धोरणात्मक महत्त्व (Significance & Delivery)
1) राजकीय व धोरणात्मक स्थिरता → सलग 3 लोकसभा निवडणुकांचे कौल आणि 4,300 पेक्षा जास्त दिवसांचा कार्यकाळ यामुळे देशाच्या धोरणांमध्ये सातत्य, प्रशासनात स्थिरता आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत अधिक स्पष्टता आली आहे.
2) आर्थिक व सामाजिक सशक्तीकरण → JAM (Jan Dhan-Aadhaar-Mobile) त्रिसूत्रीवर आधारित कल्याणकारी योजनांमुळे थेट लाभ हस्तांतरण (DBT) सुलभ झाले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर गरिबी निर्मूलन आणि सामाजिक सक्षमीकरण साध्य झाले आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• लोकशाही पद्धतीने निवडून आलेले भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे पंतप्रधान → श्री. नरेंद्र मोदी
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पूर्ण केलेले एकूण दिवस → 4,399 दिवस (10 जून 2026 पर्यंत)
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ केव्हा घेतली होती → 26 मे 2014
• भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे 'बिगर-काँग्रेस' नेते → श्री. नरेंद्र मोदी
• श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्म - 17 सप्टेंबर 1950 (गुजरात च्या वडनगर या गावी)
• पंडित जवाहरलाल नेहरू यांचा लोकशाही पद्धतीने निवडून आल्यानंतरचा सलग कार्यकाळ → 4,398 दिवस




















