
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन
International Albinism Awareness Day
📚 Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन केव्हा साजरी केला जातो ?
- 31 मे
- 13 जून
- 21 जून
- 28 जून
उत्तर : 13 जून
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 13 जून रोजी 'आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन' साजरा केला जातो.
🤔 मेलॅनिन (Melanin) द्रव्य नेमकं काय असतं ?
• मानवी त्वचेमध्ये कृष्णरंजक म्हणजेच मेलॅनिन (Melanin) हे द्रव्य असते, जे त्वचेला रंग प्राप्त करून देते.
• गडद म्हणजे सावळ्या, काळ्या त्वचेमध्ये मेलॅनिन द्रव्याचे प्रमाण जास्त असते.
• कृष्णरंजक द्रव्याच्या उपस्थितीमुळे शरीराचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते.
• कृष्णरंजक द्रव्याची निर्मिती ही प्रामुख्याने अनुवांशिक घटकांद्वारे नियंत्रित केली जाते.

🤔 वर्णहीनता (अल्बिनिझम) म्हणजे काय ?
🧐 What is Albinism ?
• वर्णहीनता (Albinism/अल्बिनिझम) हा एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरात 'मेलेनिन' (melanin) नावाचे रंगद्रव्य तयार होत नाही किंवा खूप कमी प्रमाणात तयार होते.
• वर्णहीनता म्हणजे कोड होय. यास विवर्णता किंवा धवलता असेही म्हणतात.
• माता व पिता हे दोघेही कोडाच्या व्याधीने ग्रस्त असतील, तर ही अवस्था पुढील पिढीत संक्रमित होण्याची शक्यता असते.
• अल्बिनिझम हे संसर्गजन्य नाही म्हणजेच कोड असलेल्या व्यक्तींचा संपर्क इतर व्यक्तींशी आला, तरी त्याची लागण दुसऱ्याला होत नाही.
• यात व्यक्तिंची त्वचा, केस पांढरे असतात.
• काही वेळेस डोळ्यांची बुबुळे गुलाबी अथवा रंगहीन असतात.
• अल्बिनिझम असलेल्या लोकांना मेलेनिनच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.
• त्यांना त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

🧐 'आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन' का साजरी करण्यात येतो ?
🤔 'आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन' या दिवसाचा उद्देश कोणता ?
• अल्बिनिझम म्हणजे काय, त्याचे परिणाम काय आणि या स्थितीत असलेल्या व्यक्तींना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी.
• अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींविरुद्ध होणारा भेदभाव, गैरसमज आणि हिंसाचार थांबवण्यासाठी.
• अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींना समाजात समान संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी 13 जून रोजी 'आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन' म्हणून साजरा केला जातो.
🤔 पहिला 'आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन' केव्हा साजरी करण्यात आला ?
• 13 जून 2015 रोजी पहिला 'आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन' साजरी करण्यात आला.
🧐 आंतरराष्ट्रीय वर्णहीनता जागरूकता दिनासाठी 2026 ची मुख्य संकल्पना (थीम) कोणची ?
• "माझ्या त्वचेचा मला अभिमान आहे - सर्व त्वचा रंगांचा उत्सव साजरा करणे" (“Proudly in my skin: celebrating all skin tones”) ही 2026 साठीची संकल्पना (थीम) आहे.

परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Albinism
• आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन → 13 जून
• पहिला केव्हा साजरा झाला → 13 जून 2015 रोजी
• अल्बिनिझम (वर्णहीनता) स्थिती → हा एक दुर्मिळ अनुवांशिक (Genetic) आजार, (तो संसर्गजन्य नाही)
• मानवी त्वचेला आणि केसांना रंग देणारे मुख्य द्रव्य → मेलॅनिन (Melanin - कृष्णरंजक).
• वर्ष 2026 ची संकल्पना (Theme) → माझ्या त्वचेचा मला अभिमान आहे - सर्व त्वचा रंगांचा उत्सव साजरा करणे




















