
चालू घडामोडी | 'फूड प्लॅनेट प्राईझ' 2026
Food Planet Prize 2026
📚 Subject : GS - पुरस्कार, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'फूड प्लॅनेट प्राईझ 2026' (Food Planet Prize 2026) हा जगातील सर्वात मोठा अन्न प्रणाली पुरस्कार भारताच्या कोणत्या राज्याच्या 'नैसर्गिक शेती' उपक्रमाला मिळाला आहे ?
- आंध्र प्रदेश
- केरळ
- सिक्कीम
- आसाम
उत्तर : आंध्र प्रदेश
📰 बातमी काय ?
• आंध्र प्रदेश सरकारच्या 'कम्युनिटी मॅनेज्ड नॅचरल फार्मिंग' (APCNF) उपक्रमाला स्वीडनमध्ये अत्यंत प्रतिष्ठित असा 'फूड प्लॅनेट प्राईझ 2026' (Food Planet Prize) जाहीर झाला आहे.
• भारताची कामगिरी : 6 खंडांमधील सुमारे 1,000 हून अधिक नामांकनांना मागे टाकत भारताच्या या उपक्रमाने हा पुरस्कार पटकावला आहे.

✍️ 'फूड प्लॅनेट प्राईझ' बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• महत्त्व : हा पुरस्कार जागतिक अन्न प्रणालींमध्ये (Global Food Systems) शाश्वत आणि क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी दिला जाणारा जगातील सर्वात मोठा पर्यावरणीय पुरस्कार मानला जातो.
• स्थापना व आयोजक - स्वीडनच्या 'कर्ट बर्गफोर्स फाउंडेशन' (Curt Bergfors Foundation) द्वारे हा पुरस्कार दिला जातो.
• बक्षीस रक्कम - विजेत्याला 1.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 12.5कोटी रुपये) रक्कम दिली जाते.
• पुरस्काराचे उद्दिष्ट : हा पुरस्कार शाश्वत अन्न साखळीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्रकल्पांना थेट आर्थिक बळ देण्यासाठी दिला जातो.
🧐 APCNF उपक्रमाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये :
हा उपक्रम केवळ शेती पद्धती नसून ती एक जागतिक स्तरावर नावाजलेली लोकचळवळ बनली आहे :
1) सुरुवात आणि व्यवस्थापन → हा उपक्रम आंध्र प्रदेशच्या कृषी विभागांतर्गत 'रयतु सधीकार संस्था' (RySS) द्वारे वर्ष 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता.
2) महिला बचत गटांचे (SHGs) मोठे योगदान → सध्या हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील 18 लाख शेतकरी कुटुंबे आणि 3,40,000 महिला बचत गटांच्या साहाय्याने अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे.
3) नैसर्गिक शेती → मातीचे आरोग्य सुधारणे, जैवविविधता टिकवणे आणि रासायनिक खते व कीटकनाशकांवरील (Synthetic inputs) खर्च पूर्णपणे शून्य करणे ही या मॉडेलची मुख्य तांत्रिक ताकद आहे.
4) जागतिक अनुकरण → आंध्र प्रदेशच्या या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून भारतातील इतर 22 राज्ये, तसेच श्रीलंका आणि झांबिया यांसारखे देशही आपापल्या देशात हे मॉडेल लागू करत आहेत.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स
• फूड प्लॅनेट प्राईझ देणारी मुख्य जागतिक संस्था → कर्ट बर्गफोर्स फाऊंडेशन, स्वीडन
• 'फूड प्लॅनेट प्राईझ' जिंकणारा उपक्रम → आंध्र प्रदेश कम्युनिटी मॅनेजेड नॅचरल फार्मिंग (APCNF)
• APCNF स्वरूप → नैसर्गिक आणि समुदाय-आधारित शेती पद्धती
• APCNF उपक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती → 2016 मध्ये
• उपक्रम आंध्र प्रदेशात राबवणारी नोडल संस्था → रयतु सधीकार संस्था





















