Central Vigilance Commission
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र, वैधानिक संस्था
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्रीय दक्षता आयोगात (Central Vigilance Commission) नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1. श्री. संजय कोठारी
2. श्री. प्रवीण वशिष्ठ
3. श्री. राजीव कुमार
4. श्री. अजय कुमार भल्ला
उत्तर : श्री. प्रवीण वशिष्ठ (Praveen Vashista)
📰 बातमी काय ?
• श्री. प्रवीण वशिष्ठ यांची केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त (Vigilance Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
• त्यांनी 16 जानेवारी 2026 रोजी पदाची शपथ घेतली.
• श्री. प्रवीण वशिष्ठ हे बिहार कॅडरचे 1991 बॅचचे IPS अधिकारी आहे.

🤔 केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे काय ?
• केंद्रीय दक्षता आयोग हा भारत सरकारचा सर्वोच्च दक्षता व प्रामाणिकता संस्था आहे.
• केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार रोखणे, पारदर्शकता वाढवणे आणि प्रशासनात जबाबदारी (Accountability) सुनिश्चित करणे हे या आयोगाचे मुख्य कार्य आहे.
🏛️ स्थापना व कायदेशीर दर्जा :
• स्थापना : केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना 1964 साली भारत सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे करण्यात आली.
• सुरुवातीला आयोगाला कायदेशीर दर्जा नव्हता, त्यामुळे त्याचे अधिकार मर्यादित होते.
• नंतर Central Vigilance Commission Act, 2003 अंतर्गत आयोगाला वैधानिक (Statutory) दर्जा देण्यात आला आणि तो एक स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करू लागला.
केंद्रीय दक्षता आयोगाची (CVC) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवर करण्यात आली ?
• या आयोगाची संकल्पना संथानम समिती (Santhanam Committee) यांच्या शिफारशींवर आधारित आहे.
• या समितीने केंद्र सरकारमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वतंत्र दक्षता यंत्रणेची गरज अधोरेखित केली होती.
👥 रचना व सदस्यसंख्या :
• केंद्रीय दक्षता आयोगाचे नेतृत्व मुख्य दक्षता आयुक्त (Central Vigilance Commissioner) करतात.
• त्यांना जास्तीत जास्त दोन दक्षता आयुक्त मदत करतात.
• या पदांवरील नियुक्त्या राष्ट्रपतींकडून, उच्चस्तरीय निवड समितीच्या शिफारशीवर केल्या जातात.
• कार्यकाळ 4 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे, यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढा असतो.
⚙️ संघटनात्मक रचना :
• आयोगाचे सचिवालय सचिवांच्या नेतृत्वाखाली कार्य करते.
• यामध्ये Chief Technical Examiners (CTE) शाखा कार्य करतात, ज्या कंत्राटांतील तांत्रिक बाबी तपासतात.
• Commissioners for Departmental Inquiries (CDIs) हे विभागीय चौकशी अधिकारी म्हणून काम करतात.
• तसेच विविध मंत्रालये, विभाग, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आणि बँकांमध्ये कार्यरत Chief Vigilance Officers (CVOs) हे CVC चे विस्तारित हात म्हणून कार्य करतात.
🎯 अधिकारक्षेत्र (Jurisdiction) :
• केंद्रीय दक्षता आयोगाचे अधिकार केंद्र सरकारच्या All India Services आणि Group ‘A’ अधिकाऱ्यांपर्यंत आहेत.
• यामध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, Reserve Bank of India (RBI), NABARD, SIDBI, LIC आणि विमा कंपन्यांचा समावेश होतो.
• भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत होणाऱ्या चौकशींमध्ये Central Bureau of Investigation (CBI) वर CVC चे देखरेख अधिकार (Superintendence) आहेत.
• लोकपालकडून पाठवलेल्या तक्रारींवर प्राथमिक चौकशी करण्याचाही अधिकार केंद्रीय दक्षता आयोगाला (CVC) आहे.
🛡️ प्रमुख कार्ये :
• केंद्रीय दक्षता आयोग (CVC) केंद्र सरकारमधील दक्षता यंत्रणेवर देखरेख व समन्वय साधते.
• भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची चौकशी किंवा चौकशीसाठी निर्देश देते.
• मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांना दक्षतेविषयक सल्ला देते.
• CBI कडील भ्रष्टाचार प्रकरणांवरील चौकशीच्या प्रगतीचा आढावा घेते.
• तसेच Whistle Blower संरक्षण देण्यासाठी PIDPI ठराव अंतर्गत प्राधिकृत संस्था म्हणून कार्य करते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• नियुक्त अधिकारी : प्रवीण वशिष्ठ (IPS, बिहार कॅडर, 1991)
• पद : Vigilance Commissioner
• शपथ दिनांक : 16 जानेवारी 2026
• संस्था : Central Vigilance Commission (CVC)
• स्थापना : 1964
• वैधानिक दर्जा : CVC Act, 2003
• शिफारस समिती : Santhanam Committee
• रचना : 1 CVC + 2 Vigilance Commissioners
• कार्यकाळ : 4 वर्षे / 65 वर्षे
• CBI वर अधिकार : भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये देखरेख
• Whistle Blower संरक्षण : PIDPI Resolution
