
चालू घडामोडी | टायलर पुरस्कार

Tyler Prize
Subject : GS - पर्यावरण, पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मायकोरायझल बुरशीवरील संशोधनासाठी टायलर पुरस्कार कोणत्या शास्त्रज्ञाला मिळाला ?
1. जेन गुडॉल
2. टोबी कियर्स
3. मायकेल मॅन
4. माधव गाडगीळ
उत्तर : टोबी कियर्स (Toby Kiers)
📰 बातमी काय ?
• अमेरिकन मायकोलॉजिस्ट आणि उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ टोबी कियर्स (Toby Kiers) यांना वनस्पती आणि बुरशी यांच्यातील परस्परसंबंधांवर (Mycorrhizal Networks) केलेल्या संशोधनासाठी Tyler Prize for Environmental Achievement देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

🧐 टोबी कियर्स यांना हा पुरस्कार का देण्यात आला ?
• टोबी कियर्स यांनी Mycorrhizal Networks या अदृश्य पण अत्यावश्यक जैविक व्यवस्थेवर संशोधन केले आहे.
• या नेटवर्कद्वारे वनस्पतींच्या मुळांना बुरशी जोडलेली असते आणि त्यामुळे संपूर्ण परिसंस्थेतील पोषण, पाणी आणि कार्बनचे संतुलन राखले जाते.
• त्यांच्या संशोधनामुळे पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी नवे दृष्टिकोन मिळाले आहेत.
🌱 मायकोरायझल नेटवर्क म्हणजे काय ?
What are Mycorrhizal Networks ?
• Mycorrhizal Networks म्हणजे जमिनीखालील बुरशीचे (Fungi) जाळे, जे अनेक वनस्पतींच्या मुळांना एकमेकांशी जोडते.
• या परस्परसहजीवनात (Symbiotic Relationship) वनस्पती बुरशीला कार्बोहायड्रेट्स देतात, तर बदल्यात बुरशी वनस्पतींना पाणी आणि आवश्यक पोषकद्रव्ये जसे की, फॉस्फरस नायट्रोजन- उपलब्ध करून देते.
• या प्रणालीला Wood Wide Web असेही म्हटले जाते.
🌍 पर्यावरणीय महत्त्व :
• वन परिसंस्थांमध्ये हे जाळे दरवर्षी सुमारे 13 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड (CO₂) जमिनीत साठवण्यास मदत करते, ज्यामुळे हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यास मोठा हातभार लागतो.
• म्हणूनच ही प्रणाली पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते.
🏅 Tyler Prize विषयी माहिती :
• टायलर पर्यावरण पुरस्काराची स्थापना जॉन (John) आणि ॲलिस टायलर (Alice Tyler) यांनी 1973 मध्ये केली.
• हा पुरस्कार University of Southern California द्वारे प्रशासित केला जातो.
• हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जात असून, त्याला “पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार” असेही म्हटले जाते.

टायलर पुरस्कार कोणत्या भारतीय पर्यावरणतज्ज्ञांना देण्यात आला ?
• पर्यावरणशास्त्रात केलेल्या कामगिरीसाठी सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा सन 2015 चा टायलर पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, आणि संशोधक डॉ. माधव गाडगीळ सरांना देण्यात आला होता.

🔑 टायलर पुरस्कार संदर्भात परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• पुरस्काराचे नाव : Tyler Prize for Environmental Achievement
• टोपणनाव : पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार
• स्थापना : 1973
• स्थापक : जॉन आणि ॲलिस टायलर
• प्रशासक संस्था : University of Southern California
• पारितोषिक रक्कम : $250,000
• अलीकडील सन्मानित व्यक्ती : टोबी कियर्स
• संशोधन विषय : Mycorrhizal Networks (Wood Wide Web)
• CO₂ शोषण क्षमता : ~13 अब्ज टन प्रतिवर्ष
• भारतीय विजेते : डॉ. माधव गाडगीळ (2015)



























