
चालू घडामोडी | भारतीय हवामानशास्त्र विभाग स्थापना दिन

India Meteorological Department's 151st Anniversary
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण, भूगोल, आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
1. 1875
2. 1900
3. 1948
4. 1982
उत्तर : 1875
बातमी काय आहे ?
• भारतीय हवामानशास्त्र विभाग (India Meteorological Department) ने 15 जानेवारी 2026 रोजी आपला 151 वा वर्धापन दिन साजरा केला.
• कार्यक्रमादरम्यान 2026 या वर्षात दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुणे येथे प्रत्येकी 50 स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित केली जातील ; अशी घोषणा ही करण्यात आली.
• दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये, विशेषतः स्थानिक पातळीवरील, रिअल-टाइम हवामान अंदाज आणि आपत्ती पूर्वतयारी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 15 जानेवारी 1875 रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली.
भारतीय हवामानशास्त्र विभाग कोणत्या मंत्रालया अंतर्गत काम करते ?
• भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth Sciences) अंतर्गत काम करते.
• भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) देशाला हवामानविषयक सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय (Headquarters) कोठे आहे ?
• नवी दिल्ली येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय आहे.
हवामानशास्त्र विभागाची उद्दिष्टे काय आहेत ?
हवामानशास्त्र विभाग काय काम करते ?
• हवामानाच्या विविध घटकांची सतत निरीक्षणे करणे, त्यांचे विश्लेषण व त्यावर आधारित सद्यस्थितीचे व पुढील काळासाठीच्या हवामानाचे पुर्वानुमान करणे.
• उष्णकटिबंधीय वादळे, धुळीची वादळे, अतिवृष्टी, उष्णतेची व थंडीची लाट, विजा कोसळणे, हवेतील प्रदूषणाची पातळी वाढणे यासारख्या तीव्र हवामानाच्या आपत्तींचे विभागनिहाय पुर्वानुमान वर्तवणे व त्यासंबंधी योग्य तो इशारा देणे.
• ही माहिती कृषी, जलसंधारण, नौकानयन, मच्छीमार, हवाई वाहतूक, समुद्रातील इंधन शोधन इ. क्षेत्रांना नियमितपणे पुरविणे.
• हवामानशास्त्र व त्याला संलग्न असलेल्या विषयात संशोधन करणे आणि अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.
भारतीय हवामानशास्त्र विभागा कडून (IMD) दिले जाणारे इशारे : (Color Coding System)
• IMD हवामान इशाऱ्यांसाठी 4-स्तरीय रंग कोड प्रणाली वापरते:
🟢 Green Alert – कोणताही धोका नाही
🟡 Yellow Alert – सतर्क रहा
🟠 Orange Alert – तयार रहा
🔴 Red Alert – तात्काळ कृती आवश्यक
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे सध्याचे महासंचालक (Director General of Meteorology) कोण ?
• डॉ. मृत्युंजय महापात्रा (Dr. M. Mohapatra)

जागतिक भूमिका :
• भारतीय हवामानशास्त्र विभाग हा जागतिक हवामानशास्त्र परिषदेच्या (World Meteorological Organization) सहा विशेष क्षेत्रिय हवामानशास्त्र केंद्रांपैकी एक आहे.
• या केंद्रावर मलाक्का सामुद्रधुनीसह उत्तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि पर्शियाचे आखात येथील विषुवृत्तीय वादळांचा अंदाज देणे व तो सर्वत्र पोहचविणे तसेच त्या वादळाचे नामकरण करणे या विशेष जबाबदाऱ्या आहेत.
🔑 भारतीय हवामानशास्त्र विभाग - परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स
• स्थापना : 15 जानेवारी 1875
• मंत्रालय : पृथ्वी विज्ञान मंत्रालय
• मुख्यालय : नवी दिल्ली
• IMD काम : चक्रीवादळ नामकरण
• इशारे : Green–Yellow–Orange–Red
• WMO सदस्य : होय
• सध्याचे प्रमुख : डॉ. एम. महापात्रा

























