
चालू घडामोडी | महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन

Maharashtra Sports Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1. 30 डिसेंबर
2. 12 जानेवारी
3. 15 जानेवारी
4. 24 जानेवारी
उत्तर : 15 जानेवारी
📰 बातमी काय आहे ?
• महाराष्ट्र राज्य शासनाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
• या अनुषंगाने 12 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन क्रीडा विभागाने केले होते.
महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन केव्हा आणि कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
• महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी ला साजरी करतात.
• 15 जानेवारी हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आहे.
• कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावी झाला.
• खाशाबा जाधव हे भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते आहे.
• 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती (फ्रीस्टाइल) प्रकारात कांस्य पदक जिंकले
• ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या गौरवार्थ हा दिवस महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे मुख्य उद्दिष्टे :
• महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन हा राज्यातील क्रीडापटूंना प्रेरणा देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीचा प्रसार व विकास करण्यासाठी साजरा केला जाणारा अधिकृत राज्यस्तरीय दिन आहे.
• खाशाबा जाधव यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणे
• नवोदित खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन देणे
• शालेय व महाविद्यालयीन स्तरावर क्रीडा संस्कृती रुजवणे - हे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे मुख्य उद्दिष्टे आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन = 15 जानेवारी
• संबंधित व्यक्ती = खाशाबा जाधव
• खाशाबा जाधव = भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते
• ऑलिम्पिक = 1952, हेलसिंकी
• खेळ = कुस्ती (फ्रीस्टाइल)
• राष्ट्रीय क्रीडा दिन = 29 ऑगस्ट (मेजर ध्यानचंद)
• महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन = 15 जानेवारी (खाशाबा जाधव)























