
चालू घडामोडी | बामनवास कांकर ग्रामपंचायत

Bamanwas Kankar Panchayat
Subject : GS - पर्यावरण, अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बामनवास कांकर ग्रामपंचायत ही खालील पैकी कोणत्या राज्यातील पहिली पूर्णतः सेंद्रिय (Fully Organic) ग्रामपंचायत ठरली आहे ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. मध्यप्रदेश
4. राजस्थान
उत्तर : राजस्थान
बातमी काय ?
• राजस्थानमधील कोटपूतली–बहरोड जिल्ह्यातील बामनवास कांकर ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली पूर्णतः सेंद्रिय (Fully Organic) म्हणून प्रमाणित ग्रामपंचायत ठरली आहे.
पहिली पूर्णतः सेंद्रिय (Fully Organic) प्रमाणित ग्रामपंचायती बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• राजस्थानमधील बामनवास कांकर ग्रामपंचायतीने स्वतःहून निर्णय घेऊन 100% सेंद्रिय शेती (Organic Farming) आणि पर्यावरणपूरक पशुपालन स्वीकारले आहे.
• बामनवास कांकर या ग्रामपंचायतीने सर्व शेती व पशुपालन पद्धतींमधून रासायनिक खते, कीटकनाशके आणि कृत्रिम घटक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
• ही घटना भारतातील रासायनिक-मुक्त व शाश्वत शेतीकडे होणाऱ्या तळागाळातील बदलाचे महत्त्वपूर्ण उदाहरण मानली जाते.

या उपक्रमाचे उद्दिष्टे कोणते ?
• शेतीमधील रासायनिक अवलंबित्व कमी करणे,
• शेती-परिसंस्था पुनर्जीवित करणेआणि
• शेतकऱ्यांचे उत्पन्न व आरोग्य सुधारणे हा आहे. - हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्टे आहेत.
कांकर ग्रामपंचायतीचा हा उपक्रम विशेष का मानला जातो ?
• हा बदल कोणत्याही वरून लादलेल्या सरकारी आदेशामुळे नसून, तो ग्रामसभेतील सामूहिक निर्णयातून (Community-Led Transition) झाला आहे.
• म्हणजेच, हा उपक्रम Bottom-Up Governance चे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्रिय भूमिकेचे उत्तम उदाहरण आहे.
बामनवास कांकर पंचायतची ठळक वैशिष्ट्ये :
• बामनवास कांकर ग्रामपंचायत सात लहान वाड्यांनी (Hamlets) बनलेली आहे.
• येथे सर्व पिके रासायनिक खतांशिवाय व कीटकनाशकांशिवाय घेतली जातात,
• तर पशुपालन आरोग्यदायी व पर्यावरणपूरक मानकांनुसार केले जाते.
• या संपूर्ण प्रक्रियेला Cofarmin Federation of Organic Societies and Producer Companies (COFED) या संस्थेचे तांत्रिक व संस्थात्मक पाठबळ मिळाले आहे.
• COFED कडून प्रमाणन, डेटा संकलन आणि बाजारपेठेशी जोडणी (Market Linkage) यामध्ये मदत केली जाते.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ कसा होतो ?
• सेंद्रिय प्रमाणनामुळे शेतकऱ्यांना प्रीमियम बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळतो आणि
• महागडी रासायनिक खते व कीटकनाशकांवरील खर्च कमी होतो.
• यामुळे शेतकऱ्यांचे इनपुट खर्च घटतात आणि दीर्घकालीन उत्पन्नात स्थैर्य येते.
पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व :
• रासायनिक-मुक्त शेतीमुळे मातीची सुपीकता वाढते आणि
• भूजल पातळीवरील ताण कमी होतो.
• तसेच, शेतकरी व ग्राहक विषारी कृषी-रसायनांच्या संपर्कातून मुक्त होतात.
• या भागात उपयुक्त कीटक आणि मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढत असल्याने जैवविविधतेला चालना मिळते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• बामनवास कांकर = राजस्थानची पहिली पूर्णतः सेंद्रिय ग्रामपंचायत
• जिल्हा = कोटपूतली–बहरोड
• स्वरूप = 100% Organic Farming + Eco-Friendly पशुपालन
• उपक्रमाचा प्रकार = Community-Led (Bottom-Up)
• संस्थात्मक पाठबळ = COFED
• फायदे = माती-पाणी सुधारणा, कमी खर्च, चांगले दर





















