
चालू घडामोडी | काश्मीर मारखोर

Kashmir Markhor
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न)" काश्मीर मारखोर" या प्रजातीबाबत कोणते विधान बरोबर आहे ?
1. संपूर्ण हिमालयात मोठ्या प्रमाणावर आढळते
2. फक्त जम्मू-काश्मीरमध्ये आढळणारी स्थानिक प्रजाती आहे
3. मांसाहारी आहे
4. मैदानी जंगलात राहते
उत्तर : फक्त जम्मू-काश्मीरमध्ये आढळणारी स्थानिक प्रजाती आहे
बातमी काय ?
• भारतामधील सर्वात दुर्मिळ वन्य शेळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर मारखोर प्रजातीला सध्या स्थानिक नामशेष होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
काश्मीर मारखोर म्हणजे काय ?
• काश्मीर मारखोर ही मारखोर (Capra Falconeri) या वन्य शेळीची उपप्रजाती आहे.
• "मारखोर" हे नाव प्राचीन लोककथांवर आधारित पर्शियन भाषेतून आले आहे ज्याचा अर्थ "साप मारणारा" असा होतो.
• उंच डोंगराळ भागात राहणारा हा प्राणी मोठ्या आकाराचा, बलवान आणि अतिशय चपळ आहे.
• त्याची नागमोडी शिंगे आणि खडकाळ कड्यांवर सहज हालचाल करण्याची क्षमता यांमुळे तो वेगळा ठरतो.
• भारतात ही उपप्रजाती फक्त जम्मू-काश्मीरमध्येच आढळते.
हा विषय चिंतेचा का आहे ?
• काश्मीर मारखोर अधिवास अत्यंत मर्यादित असल्याने त्यांची संख्या घटणे म्हणजे भारतातच या प्रजातीचा नाश होण्याचा धोका वाढणे होय.
• उपलब्ध माहितीनुसार भारतात केवळ 200 ते 300 काश्मीर मारखोर उरले असून, त्यांचा बहुतांश अधिवास जम्मू-काश्मीरमधील काझीनाग राष्ट्रीय उद्यान (Kazinag National Park) परिसरापुरताच मर्यादित राहिला आहे.
• ही स्थिती पर्वतीय जैवविविधतेच्या दृष्टीने चिंताजनक मानली जाते.
मारखोर ची संख्या कमी का होत आहेत ?
• मारखोर बकरीची त्यांच्या शिंगांसाठी बेकायदेशीर शिकार केली जाते.
• मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या अधिवास नष्ट होणे.
• हवामानातील बदल
• अन्नासाठी स्पर्धा या काही प्रमुख कारणांमुळे त्यांची संख्या कमी होत आहे.
अधिवास आणि वितरण :
• काश्मीर मारखोर प्रामुख्याने पीर पंजाल पर्वतरांगांतील उंच, खडकाळ भागात आढळतो.
• तो काझीनाग राष्ट्रीय उद्यानाबरोबरच हिरपोरा वन्यजीव अभयारण्य, तट्टाकुटी वन्यजीव अभयारण्य आणि खरा गली संवर्धन राखीव क्षेत्र येथेही आढळतो.
• खडकाळ कडे, उघडी जंगले आणि अल्पाइन कुरणे हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत.
आहार व परिसंस्थेतील भूमिका :
• काश्मीर मारखोर शाकाहारी असून तो गवत, औषधी वनस्पती, झुडपे, पाने आणि फांद्या खातो.
• यामुळे पर्वतीय भागातील वनस्पतींची अतिवाढ नियंत्रित राहते आणि मातीची गुणवत्ता टिकून राहते.
• तसेच, तो हिमचित्ता, बिबट्या आणि लांडगा यांसारख्या भक्षकांसाठी महत्त्वाचा भक्ष्य प्राणी असल्याने अन्नसाखळीतील त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
पर्यावरणीय महत्त्व :
• काश्मीर मारखोर परिसंस्था निर्देशक प्राणी (Ecological Indicator) मानले जाते.
• या प्रजातीची लोकसंख्या निरोगी असेल तर पर्वतीय परिसंस्था संतुलित असल्याचे सूचित होते.
• त्यामुळे या प्रजातीचे संवर्धन म्हणजे संपूर्ण पर्वतीय परिसंस्थेचे (Mountain Ecosystem) संरक्षण होय.
मारखोर बकरीचे संवर्धन :
• आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत (IUCN Red List) जवळपास धोक्यात (Near Threatened) या श्रेणींमध्ये मारखोर शेळीची नोंद करण्यात आली आहे.
• मारखोर बकरीची वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 मध्ये अनुसूची 1 मध्ये नोंद आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• काश्मीर मारखोर = भारतातील सर्वात दुर्मिळ वन्य शेळी
• शास्त्रीय नाव = काप्रा फाल्कोनेरी (Capra Falconeri)
• स्थानिक प्रजाती = फक्त जम्मू-काश्मीर
• मुख्य अधिवास = काझीनाग राष्ट्रीय उद्यान
• पर्वतरांग = पीर पंजाल
• शिंगे = नागमोडी
• भूमिका = परिसंस्था निर्देशक + भक्ष्य प्राणी
• सध्याची संख्या = सुमारे 200–300






















