
चालू घडामोडी | संरक्षण दलाचा माजी सैनिक दिन

Defence Forces Veterans Day
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण (Defence)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 14 जानेवारी 2026 रोजी संरक्षण दलाचा कितवा ‘माजी सैनिक दिन’ (Veterans Day) साजरा करण्यात आला ?
1. पाचवा
2. दहावा
3. पंधरावा
4. विसाव्वा
उत्तर : दहावा
📰 बातमी काय ?
• पुणे येथील हवाई दल तळावर 14 जानेवारी 2026 रोजी संरक्षण दलाचा 10 वा माजी सैनिक दिन (Defence Forces Veterans’ Day) साजरा करण्यात आला.
• या दिनाला सशस्त्र सेना माजी सैनिक दिन (Armed Forces Veterans’ Day) असेही म्हणतात.

संरक्षण दलाचा माजी सैनिक दिन 14 जानेवारी ला का साजरी करतात ?
• 14 जानेवारी 1953 या दिवशी सशस्त्र दलाचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के एम करिअप्पा (Field Marshal KM Cariappa) सेवानिवृत्त झाले.
• कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांनी केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ दरवर्षी 14 जानेवारी रोजी सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा केला जातो.

पहिला सशस्त्र सेना माजी सैनिक दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• हा दिवस पहिल्यांदा 14 जानेवारी 2017 मध्ये साजरा करण्यात आला होता.
• देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि निःस्वार्थ सेवा करणाऱ्या वीरांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी 2017 पासून माजी सैनिक दिवस साजरा केला जातो.
माजी सैनिक दिन साजरा करण्यामागील उद्देश कोणता ?
• माजी सैनिक दिनाचा उद्देश फक्त सन्मान करणे एवढाच नसून,
• माजी सैनिकांशी संबंधित महत्त्वाच्या कल्याणकारी बाबींवर लक्ष केंद्रीत करणे हा देखील आहे.
➡️ यामध्ये विशेषतः –
• पेन्शन विषयक प्रश्न
• तक्रार निवारण
• आर्थिक सहाय्य
• ईसीएचएस (ECHS) योजना
• माजी सैनिकांसाठीच्या कल्याणकारी योजना - या मुद्द्यांचा समावेश होतो.
🏛️ शासनाच्या दृष्टीने महत्त्व :
• या दिनाच्या माध्यमातून सरकार आणि संरक्षण यंत्रणा माजी सैनिकांसाठी संवाद व समन्वयाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात.
• यामुळे माजी सैनिकांच्या समस्या संस्थात्मक पातळीवर मांडल्या जातात आणि त्यावर उपाययोजना करता येतात.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• माजी सैनिक दिन = 14 जानेवारी
• कारण = फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा सेवानिवृत्त झाले
• उद्देश = माजी सैनिकांचा सन्मान + कल्याणकारी मुद्द्यांवर लक्ष
• स्वरूप = संरक्षण दलाशी संबंधित राष्ट्रीय निरीक्षण दिवस























