
चालू घडामोडी | ब्रिक्स इंडिया 2026 बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण

Launch of BRICS India 2026 Logo, Theme and Website
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ब्रिक्स इंडिया 2026 च्या अध्यक्षतेसाठी भारताने जाहीर केलेली संकल्पना (थीम) कोणती ?
1. जागतिक कल्याणासाठी एकत्रितपणा
2. आर्थिक वर्चस्व आणि सामरिक सहकार्य
3. लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी
4. बहुपक्षीय व्यापार सुधारणा
उत्तर : लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी
🗞️ बातमी काय ?
• भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी 13 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे भारताची ब्रिक्स अध्यक्षता 2026 साठी चे बोधचिन्ह, संकल्पना आणि वेबसाइटचे अनावरण केले.
• 2026 हे वर्ष BRICS च्या स्थापनेला 20 वर्षे (2006–2026) पूर्ण होण्याचे स्मरणीय वर्ष असून, या संपूर्ण वर्षभर भारत BRICS चे अध्यक्षपद भूषवणार आहे.


ब्रिक्स इंडिया 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
What is the theme of India’s BRICS Chairship in 2026 ?
• भारताच्या ब्रिक्स इंडिया अध्यक्षतेची संकल्पना - " लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी " अशी आहे.
• "Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability"

BRICS India 2026 Chairship लोगो काय दर्शवतो ?
• BRICS India 2026 चा लोगो भारताच्या अध्यक्षतेचा अधिकृत प्रतीकात्मक संदेश व्यक्त करतो.
🪷 लोगोतील घटक आणि त्यांचा अर्थ :
कमळ (Lotus) :
➤ पवित्रता, लवचिकता आणि प्रगतीचे प्रतीक
➤ भारतीय ओळख आणि सातत्यपूर्ण विकास दर्शवतो
पाकळ्यांचे रंग :
➤ BRICS सदस्य देशांचे प्रतिनिधित्व
➤ सामूहिक ताकद आणि एकतेचे प्रतीक
मध्यभागी ‘नमस्ते’ हस्तमुद्रा :
➤ सन्मान, संवाद आणि सौहार्दपूर्ण सहकार्य
➤ भारताची समन्वयवादी आणि शांततामय भूमिका
👉 एकत्रितपणे BRICS India 2026 चा लोगो परंपरा आणि आधुनिकतेचा संगम, तसेच BRICS मधील सामूहिक शक्ती व एकता दर्शवतो.
🌐 BRICS India 2026 वेबसाइट : brics2026.gov.in
• BRICS India 2026 ची अधिकृत वेबसाइट भारताच्या अध्यक्षतेदरम्यान —
• बैठका
• उपक्रम
• निर्णय व निष्कर्ष - यासाठी केंद्रीय डिजिटल व्यासपीठ म्हणून कार्य करेल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• BRICS अध्यक्ष देश (2026): भारत
• अध्यक्षतेचा कालावधी : संपूर्ण वर्ष 2026
• BRICS स्थापना : 2006
• 2026 : BRICS चे 20 वे वर्ष
• थीम : लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी

























