
चालू घडामोडी | भारतीय लष्कर दिन 2026

Indian Army Day 2026
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 78 व्या भारतीय लष्कर दिन संचलनाचे (आर्मी डे परेड) आयोजन खालील पैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?
1. पुणे
2. जयपूर
3. चेन्नई
4. नवी दिल्ली
उत्तर : जयपूर
🗞️ बातमी काय ?
• 15 जानेवारी 2026 रोजी Indian Army ने आपला 78 वा लष्कर दिन (Army Day) राजस्थानातील जयपूर येथे साजरा केला.
• या निमित्ताने भारतीय लष्कराच्या आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नेटवर्क-केंद्रित युद्धपद्धतीकडे होत असलेल्या संक्रमणावर भर देण्यात आला.
आर्मी डे का साजरा केला जातो ?
• 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारताचे लष्करप्रमुख ब्रिटिश अधिकारीच होते.
• आर्मी डे हा भारतीय सैन्याची कमांड ब्रिटीश अधिकाऱ्याकडून भारतीय अधिकाऱ्याकडे हस्तांतरित केल्याबद्दल चिन्हांकित करतो.
• 15 जानेवारी 1949 रोजी, के एम करिअप्पा, एक भारतीय जनरल यांनी ब्रिटीश जनरल सर बुचर यांच्याकडून लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
• 15 जानेवारी या दिवशी फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा हे भारतीय लष्कराला कमांड देणारे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ बनले.
• भारतीय लष्करातील या महत्त्वाच्या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतात सेना दिवस (भारतीय लष्कर दिन) म्हणून साजरा केला जातो.

नवी दिल्लीबाहेर चौथी आर्मी डे परेड :
• पारंपरिकरीत्या दिल्लीमध्ये होणारे हे संचलन 2023 पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात सुरूवात झाली.
• 2023 ची आर्मी डे परेड कर्नाटकातील बेंगळुरू
• 2024 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये
• 2025 मध्ये पुणे येथे
• 2026 मध्ये राजस्थानातील जयपूर येथे आर्मी डे परेड आयोजित करण्यात आला.
⚙️ भारतीय लष्कर दिन 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• “Year of Networking and Data Centricity” ही भारतीय सेना दिवस 2026 ची संकल्पना (थीम) आहे.
• भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष ‘नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.
• या उपक्रमाचा उद्देश लष्कर अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आहे.
🛡️ धोरणात्मक बदल : Bhairav Battalion
• 15 जानेवारी 2026 च्या लष्कर दिनाच्या राजस्थानातील जयपूर या परेडमध्ये भैरव बटालियन (Bhairav Battalion) चे प्रथमच प्रदर्शन करण्यात आले.
• भैरव बटालियन -कमी पण अत्यंत प्रशिक्षित मनुष्यबळ, वेगवान प्रतिसाद देणारी युनिट आहे.
भारतीय लष्कराची ताकद :
• भारतीय लष्करामध्ये सुमारे 14 लाख (1.4 million) सक्रिय जवान आहेत.
• त्यामुळे भारतीय लष्कर हे जगातील सर्वात मोठे सक्रिय लष्कर मानले जाते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स
• Army Day : 15 जानेवारी
• कारण : के एम करिअप्पा – पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ (1949)
• 78 वा Army Day : 2026
• परेड स्थळ : जयपूर (राजस्थान)
• 2026 थीम : Year of Networking and Data Centricity
• भैरव बटालियन : नवीन, वेगवान लढाऊ युनिट
• Indian Army Active Strength : ~14 लाख























