
चालू घडामोडी | राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस

National Startup Day
Subject : GS - दिनविशेष, सरकारी योजना, अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय स्टार्ट अप दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 22 जानेवारी
2. 16 जानेवारी
3. 2 जानेवारी
4. 9 जानेवारी
उत्तर : 16 जानेवारी
बातमी काय ?
• नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त, स्टार्टअप इंडिया उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

स्टार्टअप इंडिया केव्हा सुरू करण्यात आला ?
• स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे, जो 16 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आला.
स्टार्टअप इंडिया म्हणजे काय ?
स्टार्टअप इंडिया सुरू कररण्याचे उद्दिष्ट कोणते ?
• एक मजबूत उद्योजकीय संस्कृतीला चालना देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
• स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत करणे, प्रक्रिया सुलभ करणे, निधी (Funding) समर्थन प्रदान करणे आणि नविन कल्पना वाढवणे स्टार्टअप इंडियाचे उद्दिष्ट आहे.
स्टार्टअप्स आणि भारताचा विकास :
स्टार्टअप इंडिया उपक्रमाचे फायदे ?
स्टार्टअप्स म्हणजे बदल घडवणारी शक्ती :
• स्टार्टअप्स फक्त नफा कमावण्यासाठी नसून समाजातील समस्या आणि पर्यावरणाशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी काम करतात.
• त्यातून रोजगार निर्माण होतो आणि नवे व्यवसाय क्षेत्र तयार होतात.
स्टार्टअप्स सर्व भागांतून पुढे येत आहेत :
• डिसेंबर 2025 पर्यंत भारतात 2 लाखांपेक्षा जास्त DPIIT-मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत.
• यापैकी सुमारे 50 % स्टार्टअप्स लहान आणि मध्यम शहरांमधून (Tier-II / Tier-III) सुरू झाले आहेत.
• यामुळे देशाचा सर्वांगीण विकास होत आहे.
आत्मनिर्भर भारताला स्टार्टअप्सचा आधार :
• अंतराळ (Space) आणि संरक्षण (Defence) यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत स्टार्टअप्सना काम करण्याची संधी दिली जात आहे.
• सरकारच्या सुधारित नियमांमुळे आणि चांगल्या व्यवसाय वातावरणामुळे हे शक्य झाले आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• राष्ट्रीय स्टार्टअप दिवस : 16 जानेवारी
• स्टार्टअप इंडिया सुरूवात : 16 जानेवारी 2016
• 2026 मध्ये पूर्ण झालेले वर्ष : 10 वर्षे
• स्टार्टअप इंडिया उपक्रम : भारत सरकार
• अंमलबजावणी संस्था : DPIIT (Department for Promotion of Industry and Internal Trade)
• DPIIT-मान्यताप्राप्त स्टार्टअप्स (डिसेंबर 2025) : 2 लाखांपेक्षा जास्त
• Tier-II / Tier-III शहरांतील स्टार्टअप्स : सुमारे 50%
• मुख्य उद्दिष्ट : उद्योजकीय संस्कृतीला चालना
• मुख्य लाभ : रोजगार निर्मिती, नवोन्मेष, निधी समर्थन
• आत्मनिर्भर भारताशी संबंध : धोरणात्मक स्टार्टअप्सना प्रोत्साहन




























