
चालू घडामोडी | राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल

National Disaster Response Force ( NDRF)
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण, भूगोल - आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1. 2000
2. 2006
3. 2010
4. 2012
उत्तर : 2006
बातमी काय ?
• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाच्या शूर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करताना त्यांचे धाडस, समर्पण आणि निस्वार्थ सेवेची प्रशंसा करत त्यांना अभिवादन केले आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 19 जानेवारी 2006 रोजी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची स्थापना करण्यात आली.
• राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा (2005) च्या प्रकरण 8 च्या कलम 44 अन्वये केंद्रीय गृहमंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची स्थापना करण्यात आली.
• 2006 मध्ये स्थापन केल्यानंतर NDRF मध्ये 8 बटालियन होत्या.
• आज NDRF मध्ये 16 बटालियन आहे.
NDRF काय काम करते ?
• नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तींपासून जनतेचा शोध व बचाव करणे, आपत्तींचे शमन करणे, प्रतिबंध करणे, पूर्वतयारी करणे व प्रतिसाद देणे, वैद्यकीय प्रथमोपचार करणे हे काम NDRF करते.
• या शूर कार्यासाठी NDRF ला ‘आपत्तीमधील देवदूत’ (Angels In Disaster) म्हटले जाते.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल प्रामुख्याने खालील आपत्तींमध्ये कार्य करते :
• भूकंप आणि कोसळलेल्या इमारती
• चक्रीवादळ, भूस्खलन, पूर, पाण्यातून बचाव करणे आणि इतर नैसर्गिक आपत्ती
• रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक आणीबाणी
उदाहरणार्थ :
• 2008 मध्ये कोसी नदी पूर
• 2010 मध्ये बेल्लारी इमारत कोसळणे
• 2023 मधील बालासोर, ओडिशा येथे रेल्वे अपघात
• केरळ, महाराष्ट्र, उत्तराखंड मधील भूस्खलन
• त्याचबरोबर जपान त्सूनामी (२०११) आणि नेपाळ भूकंप (२०१५), तुर्की आणि उत्तर-पश्चिम सीरिया भूकंप (2023) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा वेगवान प्रतिसादासाठी जागतिक स्तरावर स्तूती करण्यात आली.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) ब्रीदवाक्य (Motto) कोणते ?
• "आपदा सेवा सदैव सर्वत्र" हे NDRF चे ब्रीदवाक्य आहे.
"Aapda Seva Sadaiv Sarvatra"

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) वर्तमान महासंचालक कोण आहेत ?
• श्री पीयूष आनंद, (IPS) हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) सध्याचे महासंचालक आहेत.

























