
चालू घडामोडी | सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026

Subhash Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar 2026
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026’ कोणाला जाहीर करण्यात आला ?
1. श्री अशोक खाडे
2. श्री अनिल कुमार रस्तोगी
3. सब लेफ्टनंट आस्था पुनिया
4. लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके
उत्तर : लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके

📰 बातमी काय ?
• आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य, नेतृत्व आणि तांत्रिक कौशल्याचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल अहिल्यानगर येथील लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारकडून ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला आहे.
• नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त (पराक्रम दिवस) ही घोषणा करण्यात आली.
• देशभरातून आलेल्या 271 नामांकनांमधून, लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके वैयक्तिक श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे.
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला ?
• ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार ’पुरस्कार दोन गटांमध्ये दिला जातो :
1. Institutional Category (संस्था) : सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (Sikkim State Disaster Management Autority)
2. Individual Category (व्यक्ती) : ले. कर्नल सीता अशोक शेलके
लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार का देण्यात आला ?
• लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांनी वायनाड बचाव मोहीम दिलेले महत्वपूर्णयोगदान
• त्याचबरोबर प्रशिक्षण आणि क्षमता विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 2026 चा ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार‘ देण्यात आला.
🛡️ वायनाड बचाव मोहीम (2024) :
• 2024 मध्ये केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भीषण भूस्खलन झाले.
• या संकटाच्या काळात अत्यंत प्रतिकूल हवामानात शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांनी बचाव मोहिमेचत महत्त्वाचे योगदान दिले.
• वायनाडमधील चूरलमाला येथे त्यांनी 190 फूट लांबीचा बेली ब्रिज विक्रमी वेळेत उभारला.
• या पुलामुळे संपर्क तुटलेल्या दुर्गम गावांशी पुन्हा दळणवळण सुरू झाले आणि मदतकार्य वेगाने पोहोचू शकले.
• याशिवाय, Komatsu PC-210 एक्सकॅव्हेटरचा कल्पक वापर करून फक्त चार तासांत तात्पुरता पादचारी पूल तयार करण्यात आला.
• या अभियांत्रिकी कौशल्यामुळे बचाव आणि मदतकार्याला मोठी गती मिळाली.
👩✈️ प्रशिक्षण आणि क्षमता विकास :
• प्रत्यक्ष आपत्ती निवारणाबरोबरच लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांनी आतापर्यंत 2,300 हून अधिक जवानांना आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष तांत्रिक प्रशिक्षण दिले आहे.
• यामुळे दीर्घकालीन क्षमतेच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे.
🌱 वैयक्तिक पार्श्वभूमी : गाडीलगाव ते लष्कर
• अहिल्यानगर जिल्ह्यातील गाडीलगाव येथील रहिवासी असलेल्या सीता शेळके यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
• त्यांचे वडील अशोक भिकाजी शेळके हे पेशाने वकील आहेत.
• सीता यांनी अहिल्यानगरमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
• कठीण मानली जाणारी SSB परीक्षा उत्तीर्ण करून, त्या 2012 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधून प्रशिक्षण पूर्ण करून
• भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• पुरस्कार : सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026
• पुरस्कार जाहीर : पराक्रम दिवस (23 जानेवारी)
• Institutional Category (संस्था) : सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
• पुरस्कारप्राप्त अधिकारी : लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके
• मूळ जिल्हा : अहिल्यानगर (महाराष्ट्र)
• निर्णायक कामगिरी : वायनाड भूस्खलन बचाव मोहीम (2024)
• विशेष कामगिरी : 190 फूट बेली ब्रिज + 4 तासांत तात्पुरता पादचारी पूल
• प्रशिक्षण दिलेले जवान : 2,300+



















