
चालू घडामोडी | जननायक कर्पूरी ठाकूर

Karpoori Thakur
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कर्पूरी ठाकूर अलिकडेच बातम्यांमध्ये होते. त्यांच्याबाबत खालील पैकी काय खरे नाही ?
(MPSC राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024)
1. त्यांना ‘जननायक’ म्हणून ओळखले जाते.
2. ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते.
3. त्यांचा जन्म 1924 मध्ये, समस्तीपुर जिल्ह्यातील एका गावात झाला.
4. त्यांनी 1952 ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपुर मतदार संघातून जिंकली होती.
उत्तर : त्यांनी 1952 ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपुर मतदार संघातून जिंकली होती.- हे विधान खोटे आहे.
बातमी काय ?
• जननायक कर्पूरी ठाकूर यांची 102 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
‘भारतरत्न’ कर्पूरी ठाकूर कोण आहेत ?
जन्म :
• जननायक कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहार च्या समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया (आताचे कर्पूरीग्राम) गावात झाला.
स्वातंत्र्य चळवळीत सहभाग आणि सामाजिक कार्य :
• ‘ भारत छोडो ’ आंदोलनात सामील होण्यासाठी त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोडले.
• स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्यामुळे त्यांनी 26 महिने तुरुंगात काढले.
• देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षक म्हणून काम केले.
• मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे ओळखले जातात.
• भारतरत्न’ कर्पूरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक म्हणतात.
मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर :
• बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकुर हे अतिशय सन्माननीय नाव आहे.
• बिहारच्या राजकारणात त्यांना गरिबांचा सर्वात मोठा आवाज मानलं जायचं.
• जननायक कर्पूरी ठाकूर यांनी बिहारचे एकदा उपमुख्यमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविले.
• ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते.
• 1967 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी इंग्रजीची अट रद्द केली. त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली पण त्यांच्यामुळेच शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली.
• 1971 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांनी जमिनींवरील महसूल कर बंद केला.
• आर्थिकदृष्ट्या गरीब मुलांच्या शाळेची फी माफ करण्याचं कामही त्यांनी केलं.
• बिहार राज्यात मॅट्रिकपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा जननायक कर्पूरी ठाकूर यांनी केली, असा निर्णय घेणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री होते.
• मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण लागू केले.
• मुंगेरीलाल आयोगाच्या शिफारशीवरून त्यांनी मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षणाची व्यवस्था लागू केली.
मृत्यू :
• जननायक कर्पूरी ठाकूर यांचं 17 फेब्रुवारी 1988 रोजी, वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
भारतरत्न पुरस्कार :
• 2024 मध्ये जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



















