
चालू घडामोडी | 77वा उत्तर प्रदेश स्थापना दिन

77th Foundation Day of Uttar Pradesh
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, भूगोल
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील पैकी कोणत्या राज्याला स्वातंत्र्यापूर्वी संयुक्त प्रांत म्हणून ओळखले जात असे ?
1. उत्तर प्रदेश
2. महाराष्ट्र
3. तामिळनाडू
4. पश्चिम बंगाल
उत्तर : उत्तर प्रदेश
बातमी काय ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
उत्तर प्रदेश राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 24 जानेवारी 2026 रोजी 77 वा उत्तर प्रदेश स्थापना दिन साजरा करण्यात आला.
उत्तर प्रदेश स्थापना दिन 2026 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
"विकसित भारत, विकसित उत्तर प्रदेश " ही उत्तर प्रदेश स्थापना दिन 2026 ची संकल्पना (थीम) आहे.
Viksit Bharat, Viksit Uttar Pradesh

उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिन केव्हा असतो ?
• पूर्वी ब्रिटीश काळात हा भाग आग्रा आणि अवधचा संयुक्त प्रांत म्हणून ओळखला जात असे.
• 1935 मध्ये, त्याचे नाव बदलून संयुक्त प्रांत करण्यात आले.
• 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर राज्याचे नाव उत्तर प्रदेश ठेवण्यात आले.
उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत ?
• श्रीमती आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) या उत्तर प्रदेश च्या वर्तमान राज्यपाल आहेत.

उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
• भारतीय जनता पक्षाचे श्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती ?
• लखनऊ (Lucknow) ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे.
भारताच्या उत्तर प्रदेश राज्याला लागून कोणत्या देशाची सीमा आहे ?
• उत्तर प्रदेश राज्याला लागून नेपाळ देशाची सीमा आहे.
भारतात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे ?
• लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश भारतातील सर्वात मोठे राज्य आहे.
उत्तर प्रदेश मधील प्रमुख शहरे कोणती ?
• लखनऊ : उत्तर प्रदेश ची राजधानी
• प्रयागराज, वाराणसी, अयोध्या, मथुरा : सांस्कृतिक महत्त्व असलेले शहरे
• प्रयागराज : गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम (त्रिवेणी संगम) असलेले पवित्र ठिकाण
• प्रयागराज या पवित्र शहरात यंदाचा महाकुंभ मेळा भरणार आहे.
• आगरा : यमुना नदी काठी असलेला प्रसिद्ध ताजमहाल या ठिकाणी आहे.
• मेरठ : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 1857 च्या उठावाची सुरूवात मेरठ या ठिकाणाहून झाली. ( SSC 2023)
• तसेच झाँसी, बरेली, नोएडा, मिर्झापूर इत्यादी शहरे प्रसिद्ध आहेत.

















