
चालू घडामोडी | इंडियन स्किमर पक्ष्याच्या संवर्धनासाठी संयुक्त प्रकल्प

New Conservation Project to Protect the endangered Indian Skimmer
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) गंगा नदी खोऱ्यात धोक्यात आलेल्या इंडियन स्किमर पक्ष्याच्या संवर्धनासाठी संयुक्त प्रकल्प कोणत्या संस्थांनी सुरू केला आहे ?
1. रिलायन्स फाउंडेशन आणि केंद्रीय जल आयोग
2. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन
3. टाटा ट्रस्ट्स आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन
4. अदानी फाउंडेशन आणि केंद्रीय जल आयोग
उत्तर : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन
📰 बातमी काय ?
• बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन यांनी गंगा नदी खोऱ्यात धोक्यात आलेल्या इंडियन स्किमर पक्ष्याचे तसेच त्याच्या प्रजनन अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन संवर्धन प्रकल्प सुरू केला आहे.
• या प्रकल्पाचा उद्देश गंगा व तिच्या उपनद्यांमधील नदीपरिसंस्थेचे आरोग्य सुधारणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे हा आहे.
इंडियन स्किमर म्हणजे काय ?
• इंडियन स्किमर (Rynchops Albicollis) हा नदीकिनारी आढळणारा पक्षी असून, पाण्याच्या पृष्ठभागावरून मासे पकडण्याची त्याची खाद्यपद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
• या पक्ष्याची खालची चोच वरच्या चोचेपेक्षा लांब असल्यामुळे तो पाण्यावरून “स्किम” करत अन्न शोधतो.
🌍 अधिवास (Habitat) :
• इंडियन स्किमर प्रामुख्याने मोठ्या व संथ प्रवाहाच्या नद्यांमध्ये, वाळूचे पट्टे (Sandbars) आणि नदीतील बेटांवर आढळतो.
• गंगा, चंबळ, यमुना आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये हा पक्षी प्रजननासाठी आढळतो.
• प्रजनन हंगामाबाहेर तो किनारी (Coastal) भागात स्थलांतर करतो.
🧬 इंडियन स्किमरचे वैशिष्ट्ये :
• या पक्ष्याची चोच तेजस्वी नारिंगी रंगाची असते.
• शरीराचा वरचा भाग काळा तर खालचा भाग पांढरा असतो.
• इंडियन स्किमर समूहात घरटी बांधणारा (Colonial Nester) पक्षी असून, अनेकदा टर्न्स (Terns) पक्ष्यांसोबत वाळूच्या पट्ट्यांवर आढळतो.
• हा पक्षी नदी परिसंस्थेच्या आरोग्याचा निर्देशक (Indicator Species) मानला जातो.
📉 संवर्धन स्थिती व धोके :
• IUCN लाल यादीनुसार इंडियन स्किमरची स्थिती Endangered अशी आहे.
• जगभरात त्यांची संख्या सुमारे 3,700 ते 4,400 इतकी असून, त्यापैकी सुमारे 90% लोकसंख्या भारतात आढळते.
• धरणे, नदी प्रवाहातील बदल, वाळू उपसा, मानवी हस्तक्षेप आणि अधिवास नष्ट होणे यामुळे या पक्ष्यांच्या संख्येत तीव्र घट होत आहे.
🌱 या प्रकल्पाचे महत्त्व :
• इंडियन स्किमर हा प्रतीकात्मक प्रजाती (Flagship species) तसेच आरोग्याचा निर्देशक (Indicator species) असल्यामुळे त्याचे संरक्षण म्हणजे संपूर्ण नदी परिसंस्थेचे संरक्षण होय.
• या पक्ष्यांच्या संख्येत झालेली घट नद्यांच्या ऱ्हासाचे संकेत देते.
• म्हणूनच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन चा हा उपक्रम गंगा खोऱ्यातील जैवविविधता आणि नदी आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• प्रकल्प सुरू करणाऱ्या संस्था : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) आणि राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन
• उद्दिष्ट : इंडियन स्किमर व त्याचा प्रजनन अधिवास संरक्षण
• पक्ष्याचे नाव : Indian Skimmer (Rynchops Albicollis)
• IUCN स्थिती : Endangered (EN)
• मुख्य अधिवास : गंगा, चंबळ, यमुना व उपनद्या
• वैशिष्ट्यपूर्ण चोच : खालची चोच वरच्या चोचेपेक्षा लांब
• जागतिक लोकसंख्या : ~3,700–4,400
• भारतातील वाटा : सुमारे 90%
• प्रजातीचा प्रकार : Indicator + Flagship species
• मुख्य धोके : धरणे, वाळू उपसा, प्रवाहातील बदल, मानवी हस्तक्षेप























