
चालू घडामोडी | पद्म पुरस्कार 2026 : पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री

Padma Awards 2026 : Padma Vibhushan, Padma Bhushan & Padma Shri
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) क्रिकेटपटू श्री रोहित शर्मा यांना 2026 चा खालील पैकी कोणता नागरी पुरस्कार नुकताच जाहीर झाला ?
1. भारतरत्न पुरस्कार
2. पद्मभूषण पुरस्कार
3. पद्मश्री पुरस्कार
4. पद्मविभूषण पुरस्कार
उत्तर : पद्मश्री पुरस्कार
बातमी काय ?
• 2026 साठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले.
पद्म पुरस्काराच्या तीन श्रेणीं कोणत्या ?
• देशाच्या नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.
पद्म पुरस्कार कोणाला देण्यात येतात ?
• कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/उपक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
1. पद्मविभूषण पुरस्कार : असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिला जातो.
2. पद्मभूषण पुरस्कार : उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला जातो.
3. पद्मश्री पुरस्कार : कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
पद्म पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात येतात ?
• दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.
• हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात.
2026 साठी किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
• वर्ष 2026 साठी एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
• यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
• पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिला आहेत.
• या यादीत परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील 6 व्यक्ती आणि
• 16 मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे.
2026 साठी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
• महाराष्ट्रातील पद्मविभूषण पुरस्कार विजेते = 1
• श्री. धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) - कला क्षेत्र

2026 साठी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार विजेते = 3
1. अलका याज्ञिक - कला क्षेत्र
2. श्री. पीयूष पांडे (मरणोत्तर) - कला क्षेत्र
3. श्री. उदय कोटक - व्यापार आणि उद्योग



2026 साठी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
• महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते = 11
2026 साठी महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते कोण ?
1. आर्मिडा फर्नांडेझ - वैद्यकशास्त्र
2. श्री रोहित शर्मा - क्रीडा
3. श्री भिकल्या लाडक्या धिंडा - कला
4. श्री माधवन रंगनाथन - कला
5. श्री अशोक खाडे - व्यापार आणि उद्योग
6. श्री जनार्दन बापूराव बोथे - सामाजिक कार्य
7. श्री जुझर वासी - विज्ञान आणि अभियांत्रिकी
8. श्री रघुवीर तुकाराम खेडकर - कला
9. श्री सतीश शहा (मरणोत्तर) - कला
10. श्री सत्यनारायण नुवाल - व्यापार आणि उद्योग
11. श्री श्रीरंग देवाबा लाड - शेती








































