
चालू घडामोडी | वीरता पुरस्कार 2026 - अशोक चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र

Gallantry Awards 2026 -Ashoka Chakra, Kirti Chakra, Shaurya Chakra
Subject : GS - पुरस्कार, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या (2026) पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपतींनी किती शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली ?
1. 100
2. 93
3. 85
4. 70
उत्तर : 70
बातमी काय ?
• 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 70 सशस्त्र दल कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार मंजूर केले.
• 'वीरता पुरस्कार' वर्षातून दोनदा जाहीर केले जातात - प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त.
2026 च्या पुरस्कारांबाबत परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 77 व्या प्रजासत्ताक दिनी 70 सशस्त्र दल कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार मंजूर करण्यात आले.
• यात 6 मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे.
70 पुरस्कार पुढीलप्रमाणे :
• अशोक चक्र = 1
• कीर्ती चक्र = 3
• शौर्य चक्र = 13
• बार टू सेना पदक(शौर्य) = 1
• सेना पदक(शौर्य) = 44
• नौसेना पदक(शौर्य) = 6
• वायु सेना पदक(शौर्य) = 2
2026 मध्ये अशोक चक्र पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
• 2026 मध्ये भारताचा सर्वोच्च शांतताकाळीन वीरता पुरस्कार, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Group Captain Shubhanshu Shukla) - Indian Air Force - यांना देण्यात आला.

2026 मध्ये कीर्ती चक्र पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
• 2026 मध्ये 3 व्यक्तींना कीर्ती चक्र (Kirti Chakra) पुरस्काराने गौरविण्यात आले
1. मेजर अर्शदीप सिंह (Major Arshdeep Singh) - Army
2. नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा (Naib Subedar Doleshwar Subba) - Army
3. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर (Group Captain Prasanth Balakrishnan Nair) - Air Force



वीरता पुरस्कार

सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार (वीरता पुरस्कार) :
अशोक चक्र (Ashoka Chakra) :
• शांततेच्या काळात शौर्य, धाडसी कृती किंवा बलिदानासाठी हा सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे.
कीर्ती चक्र (Kirti Chakra) :
• हा शांतताकाळातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे आणि शांतताकाळात धाडसी कृती किंवा आत्मत्यागासाठी दिला जातो.
शौर्य चक्र (Shaurya Chakra) :
• हा शांतताकाळातील तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार
आहे. हा पुरस्कार सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना अपवादात्मक शौर्यासाठी दिला जातो.
युद्धकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार (वीरता पुरस्कार) :
परमवीर चक्र (Param Vir Chakra) :
• युद्धादरम्यान (जमिनीवर, समुद्रात किंवा हवेत) उल्लेखनीय शौर्य दाखविल्याबद्दल हा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे.
महावीर चक्र (Maha Vir Chakra) :
• जमिनीवर, समुद्रात किंवा हवेत शत्रूच्या उपस्थितीत उल्लेखनीय शौर्याच्या कृत्यांसाठी हा दुसरा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे.
वीर चक्र (Vir Chakra) :
• परमवीर चक्र आणि महावीर चक्रानंतर हा देशातील तिसरा सर्वोच्च युद्धकालीन वीरता पुरस्कार आहे.





















_1770742000338.webp)




