
चालू घडमोडी | बॅक्ट्रियन उंट

Bactrian Camel
Subject : GS - पर्यावरण, संरक्षण (Defence)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये ‘गलवान’ आणि ‘नुब्रा’ ही नावे कोणत्या प्राण्याशी संबंधित आहेत ?
1. याक
2. बॅक्ट्रियन उंट
3. हिमचित्ता
4. तिबेटी अँटीलोप
उत्तर : बॅक्ट्रियन उंट (Bactrian Camel)
बातमी काय ?
• प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये, कर्तव्य पथ (Kartavya Path) येथे भारतीय लष्कराच्या Animal Contingent अंतर्गत 'गलवान' (Galwan)आणि ‘नुब्रा’ (Nubra) हे दोन बॅक्ट्रियन उंट सहभागी झाले.
• या माध्यमातून लडाखच्या थंड वाळवंटी (Cold Desert) भूभागाचा आणि सांस्कृतिक वारशाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला.

बॅक्ट्रियन उंट :
• बॅक्ट्रियन उंट हा दोन कुबड्यांचा उंट असून तो अत्यंत थंड, कोरड्या आणि खडतर थंड वाळवंटी प्रदेशात जगण्यासाठी नैसर्गिकरित्या अनुकूल आहे.
• त्याच्या कुबड्यांमध्ये चरबी साठवली जाते (पाणी नाही), जी अन्नटंचाईच्या काळात ऊर्जा म्हणून वापरली जाते.
भारतीय सैन्यात योगदान :
• प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये गलवान आणि नुब्रा नावाचे दोन बॅक्ट्रियन उंट सहभागी झाले.
• नाव : गलवान आणि नुब्रा हे नाव लडाखमधील गलवान व्हॅली आणि नुब्रा व्हॅली यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरून देण्यात आले आहे.
• सैन्यातील उपयुक्तता : हे उंट चपळ आणि सहनशील असतात, जे अत्यंत थंड हवामान आणि विरळ ऑक्सिजनमध्ये देखील कार्य करू शकतात, ज्यामुळे ते लडाखच्या दुर्गम भागात रसद पुरवठ्यासाठी (Logistics) मौल्यवान आहेत.
भारत व जागतिक वितरण :
• भारतामध्ये बॅक्ट्रियन उंट फक्त लडाखमधील नुब्रा खोऱ्यात आढळतो.
• यामुळेच त्याचा प्रजासत्ताक दिन संचलनातील सहभाग राष्ट्रीय महत्त्वाचा ठरतो.
• जागतिक स्तरावर हा उंट मंगोलिया, चीन, कझाकस्तान आणि मध्य आशियातील प्रदेशात आढळतो.
उगम आणि नावाचा इतिहास :
• बॅक्ट्रियन उंट सुमारे 5,000 ते 6,000 वर्षांपूर्वी मध्य आशियात पाळीव बनवला गेला.
• त्याचे नाव बॅक्ट्रिया (Bactria) या प्राचीन मध्य आशियाई प्रदेशावरून पडले आहे.
प्रकार आणि IUCN स्थिती :
• बॅक्ट्रियन उंटाचे 2 प्रकार मानले जातात.
1) पहिला म्हणजे जंगली बॅक्ट्रियन उंट / Wild Bactrian Camel : (शास्त्रीय नाव - Camelus Ferus), जो IUCN नुसार गंभीरपणे धोक्यात (Critically Endangered) आहे.
2) दुसरा म्हणजे पाळीव बॅक्ट्रियन उंट/ Domestic Bactrian Camel : (शास्त्रीय नाव - Camelus Bactrianus), जो पाळीव स्वरूपात आढळतो.
ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व :
• बॅक्ट्रियन उंट हा प्राचीन काळातील सिल्क रोड व्यापाराचा मुख्य आधार होता.
• भारत, मध्य आशिया आणि चीन यांच्यातील व्यापार, संस्कृती आणि धार्मिक संपर्क (विशेषतः बौद्ध भिक्षूंची यात्रा) यामध्ये त्याची मोठी भूमिका होती.
• म्हणूनच त्याला “Ships of the Silk Road” असे म्हटले जात असे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : बॅक्ट्रियन उंट
• बॅक्ट्रियन उंट नाव : ‘गलवान’ आणि ‘नुब्रा’
• भारतातील एकमेव प्रदेश : नुब्रा खोरे, लडाख
• कुबड्यांमध्ये साठवण : चरबी (Fat)
• जंगली बॅक्ट्रियन उंट : Critically Endangered (IUCN)
• सिल्क रोड व्यापाराशी संबंधित प्राणी : बॅक्ट्रियन उंट













_1770742000338.webp)













