
चालू घडामोडी | 77 वा प्रजासत्ताक दिन

77th Republic Day
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 26 जानेवारी 2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे कोण होते ?
(सरळसेवा, पोलीस भरती, SSC GD 2019, SSC CHSL 2021,2023, SSC CPO 2024,.....)
1. डोनाल्ड ट्रम्प
2. उर्सुला व्होन डर लेयेन
3. प्रबोवो सुबियांतो
4. इमॅन्युएल मॅक्रॉन
उत्तर : उर्सुला व्होन डर लेयेन ( Ursula von der Leyen)
बातमी काय ?
• भारताने आपला 77 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहाने साजरा केला.

प्रजासत्ताक दिन 2026 ची थीम ( संकल्पना ) काय आहे ?
• वंदे मातरम् ची 150 वर्षे (150 Years of Vande Mataram) ही यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनाची संकल्पना आहे.
77 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण ?
Who is the Chief Guest of Republic Day 2026?
1. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्होन डर लेयेन (Ms Ursula von der Leyen)
2. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा (Mr António Costa) - हे मान्यवर 2026 च्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे प्रमुख पाहुणे होते.


'भारत पर्व' कार्यक्रम :
• पर्यटन मंत्रालयाच्या वतीने 26 ते 31 जानेवारी 2026 या काळात दिल्लीतील लाल किल्ल्यावर 'भारत पर्व' आयोजित केले जाईल.
• यामध्ये प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ, प्रादेशिक खाद्यपदार्थांची प्रदर्शने आणि विक्री, हस्तकला आणि विणकाम, सांस्कृतिक आणि वारसा सादरीकरणे, केंद्रीय मंत्रालयांचे स्टॉल आणि नागरिक सहभाग क्षेत्र यांचा समावेश असेल.
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास :
• भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 द्वारे भारत स्वतंत्र झाला परंतु भारत एक घटनात्मक राजेशाही बनले. यात जॉर्ज सहावा राज्य प्रमुख आणि लॉर्ड माऊंटबॅटन गव्हर्नर जनरल बनले.
• भारत राष्ट्राच्या कारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना बनवण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
• डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
• तब्बल 2 वर्षे 11 महिने 17 दिवसांच्या चर्चेनंतर 4 नोव्हेंबर 1947 रोजी संविधानाचा मसुदा संविधान सभेत मांडला गेला.
• 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले ; म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो.
• 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान लागू झाले.
• 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेने, भारत सरकार कायदा,1935 ची जागा घेतली आणि भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उद्यास आले.
26 जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का निवडला गेला ?
• 1929 च्या लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून घोषित केला.
• या दिवसाच्या स्मरणार्थ 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेला.








_1770742000338.webp)















