
चालू घडामोडी | महाराष्ट्रात भारतातील पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू

Maharashtra Launches India's 1st Menopause Clinics
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र सरकारने देशातील पहिली ‘मेनोपॉज (रजोनिवृत्ती) क्लिनिक’ का सुरू केली ?
1. मातामृत्यू कमी करण्यासाठी
2. किशोरवयीन मुलींच्या पोषणासाठी
3. महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य सेवांसाठी
4. वृद्धांसाठी मोफत औषध वितरणासाठी
उत्तर : महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य सेवांसाठी
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्र सरकारने देशातील पहिली समर्पित ‘मेनोपॉज (रजोनिवृत्ती) क्लिनिक’ सुरू केली आहे.
• या क्लिनिक्स सरकारी रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असतील.
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) :
• Menopause (रजोनिवृत्ती) म्हणजे महिलांमध्ये मासिक पाळी कायमस्वरूपी बंद होण्याची नैसर्गिक जैविक अवस्था.
• साधारणतः 45 ते 55 वयाच्या दरम्यान ही अवस्था येते.
• यामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्याचा परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो.
⚖️ पार्श्वभूमी :
• भारतात रजोनिवृत्ती ही केवळ “वयाची अवस्था” म्हणून पाहिली जाते.
• या काळात महिलांना हाडे ठिसूळ होणे, हृदयविकाराचा धोका, मानसिक ताण, झोपेचे विकार, नैराश्य अशा समस्या होतात.
• मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत यासाठी स्वतंत्र आणि संवेदनशील सुविधा नव्हत्या.
• रजोनिवृत्ती ही नैसर्गिक अवस्था असली तरी त्यासोबत येणाऱ्या शारीरिक, हार्मोनल आणि मानसिक समस्यांकडे आरोग्य व्यवस्थेत दुर्लक्ष होते, ही पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून देशातील पहिली ‘मेनोपॉज (रजोनिवृत्ती) क्लिनिक’ सुरू करण्यात आली.
🎯 मेनोपॉज क्लिनिकचे मुख्य उद्दिष्ट (Aim) :
• महिलांना रजोनिवृत्ती काळात सर्वांगीण, सन्मानपूर्वक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे.
• रजोनिवृत्तीशी संबंधित शारीरिक, हार्मोनल आणि मानसिक समस्यांचे वेळेत निदान व उपचार करणे, तसेच या विषयाला सार्वजनिक आरोग्य धोरणात मुख्य प्रवाहात आणणे.
🏥 मेनोपॉज क्लिनिक्सची प्रमुख वैशिष्ट्ये :
• ही क्लिनिक्स One-Stop Care Model वर आधारित आहेत.
• एकाच ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला, समुपदेशन, तपासण्या आणि औषधे उपलब्ध असतील.
• मानसिक आरोग्य समुपदेशनाद्वारे तणाव, चिंता, झोपेचे विकार आणि नैराश्यावर उपचार केले जातील.
• हाडांची घनता (ऑस्टिओपोरोसिस), हृदयाचे आरोग्य आणि हार्मोनल असंतुलन यासाठी तपासण्या केल्या जातील.
• सरकारी रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमधून मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा दिली जाईल.
• उपचारांसोबतच जागरूकता, मार्गदर्शन आणि भावनिक आधार यावर विशेष भर देण्यात येईल.
🎯 Student Clarity – का महत्त्वाची ?
• हा टॅापिक महिला-केंद्रित आरोग्य धोरण, मानसिक आरोग्य, आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा यांचे उत्तम उदाहरण आहे.
• प्रीलिम्समध्ये थेट प्रश्न, तर मेन्समध्ये Women Health, Inclusive Healthcare या विषयांशी जोडून उत्तर लिहिता येते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : मेनोपॉज (रजोनिवृत्ती) क्लिनिक
• देशातील पहिले राज्य : महाराष्ट्र
• क्षेत्र : महिला आरोग्य + मानसिक आरोग्य
• सुविधा : One-Stop Care Model
• समावेश : स्त्रीरोग, मानसिक समुपदेशन, हाडे-हृदय तपासणी
• स्वरूप : सरकारी रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रे
• महत्त्व : रजोनिवृत्तीला सार्वजनिक आरोग्य धोरणात मुख्य प्रवाहात आणणे




























_1770742000338.webp)



