
चालू घडामोडी | नारायण रामचंद्रन समिती

Narayan Ramachandran Committee
Subject : GS - अर्थशास्त्र, समिती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असलेली नारायण रामचंद्रन समिती कशाशी संबंधित आहे ?
1. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (PDS) सुधारणा
2. बँकिंग क्षेत्रातील भांडवली पर्याप्तता
3. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या (NPS) गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा व आधुनिकीकरण
4. विमा क्षेत्रातील प्रीमियम दर नियंत्रण, सुधारणा व आधुनिकीकरण
उत्तर : राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या (NPS) गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा व आधुनिकीकरण
📰 बातमी काय ?
• राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अधिक सुरक्षित, सक्षम आणि दीर्घकालीनदृष्ट्या उपयुक्त बनवण्यासाठी PFRDA ने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
नारायण रामचंद्रन समिती :
• या समितीचे नाव स्ट्रॅटेजिक ॲसेट अलोकेशन अँड रिस्क गव्हर्नन्स (Strategic Asset Allocation and Risk Governance -SAARG) असे असून तिचे अध्यक्ष श्री. नारायण रामचंद्रन आहेत.

नारायण रामचंद्रन समितीची स्थापना का करण्यात आली ?
• राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत होणाऱ्या गुंतवणुकीसाठी अस्तित्वात असलेले नियम बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार पुरेसे आहेत का ?
• जोखीम नियंत्रण, परतावा आणि दीर्घकालीन पेन्शन दायित्वे यांचा समतोल योग्य आहे का ?
• यांसारख्या प्रश्नांबाबत पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली होती.
• याच पार्श्वभूमीवर SAARG समितीची (नारायण रामचंद्रन समितीची) स्थापना करण्यात आली.
🎯 नारायण रामचंद्रन समिती स्थापनेचा उद्देश कोणता ?
• राष्ट्रीय पेन्शन प्रणालीची गुंतवणूक रचना अधिक मजबूत करणे,
• जागतिक पातळीवरील उत्तम पेन्शन पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करणे आणि
• राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) सदस्यांच्या दीर्घकालीन हिताचे संरक्षण सुनिश्चित करणे.
🧩 समितीची प्रमुख कार्ये :
गुंतवणूक नियमांचा सखोल आढावा :
• सध्याच्या NPS गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांची पर्याप्तता तपासणे आणि त्यांची जागतिक पेन्शन व्यवस्थांशी तुलना करणे.
मालमत्ता वर्गांचा पुनरावलोकन :
• सध्या अस्तित्वात असलेल्या गुंतवणूक प्रकारांचा आढावा घेणे आणि जोखीम कमी करण्यासाठी नवीन गुंतवणूक पर्याय सुचवणे.
गुंतवणूक वाटप धोरण :
• समभाग, रोखे, मुद्रा बाजार व इतर गुंतवणूक प्रकारांमध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक कशी करावी याबाबत शिफारसी करणे.
कामगिरी मोजमाप व जबाबदारी :
• NPS अंतर्गत कार्यरत पेन्शन निधींच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि त्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सुधारणा सुचवणे.
जोखीम व्यवस्थापन :
• बाजारातील चढ-उतार, कर्जजोखीम, तरलतेचा धोका आणि प्रशासकीय जोखीम यासाठी प्रभावी चौकट सुचवणे.
प्रशासकीय व्यवस्था :
• NPS मधील संरक्षक संस्था व मध्यस्थ यांची रचना आणि संपूर्ण गुंतवणूक प्रक्रियेचा आढावा घेणे.
शाश्वत गुंतवणूक दृष्टीकोन :
• हवामान बदलाशी संबंधित धोके आणि पर्यावरणपूरक गुंतवणूक धोरणांचा समावेश करण्याबाबत मार्गदर्शन.
⏳नारायण रामचंद्रन समितीचा कालावधी :
• SAARG समिती आपला अहवाल 9 महिन्यांच्या आत सादर करणार आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : नारायण रामचंद्रन समिती
• SAARG समितीची स्थापना : PFRDA
• PFRDA : Pension Fund Regulatory and Development Authority
• समितीचे अध्यक्ष : श्री. नारायण रामचंद्रन
• संदर्भात : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS)
• उद्देश : NPS गुंतवणूक नियमांचे आधुनिकीकरण
• अहवाल सादर करण्याची मुदत : 9 महिने
• मुख्य भर :
- गुंतवणूक वाटप
- जोखीम नियंत्रण
- पेन्शन निधींची कामगिरी
- प्रशासकीय सुधारणा
- शाश्वत गुंतवणूक






























_1770742000338.webp)