
चालू घडामोडी | निपाह विषाणू
Nipah Virus
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच जून 2026 मध्ये 'निपाह विषाणू' (Nipah Virus) च्या प्रादुर्भावामुळे हाय-अलर्ट जारी करण्यात आलेले 'कोझिकोड' हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
- केरळ
- कर्नाटक
- तामिळनाडू
- आंध्र प्रदेश
उत्तर: केरळ
📰 बातमी काय ?
• केरळमधील कोझिकोड (Kozhikode) येथे निपाह विषाणूचे (Nipah Virus - NiV) नवीन रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. मानवी संसर्ग रोखण्यासाठी तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाईन सारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.
🧐 निपाह विषाणूचा प्रादुर्भाव सर्वप्रथम कोणत्या आढळून आला ?
• निपाह विषाणूचा प्रादुर्भाव सर्वप्रथम 1998-99 मध्ये मलेशियातील 'कांपुंग सुंगाई निपाह' (Kampung Sungai Nipah) या गावात लागला.
• या गावाच्या नावावरूनच या विषाणूला 'निपाह' हे नाव देण्यात आले.
निपाह विषाणू रोगाचा प्रकार -
• रोगाचा प्रकार - हा एक अत्यंत संसर्गजन्य झुनोटिक विषाणू (Zoonotic Virus) आहे, म्हणजेच हा आजार प्राण्यांकडून मानवांमध्ये पसरतो.
• विषाणूचे कुटुंब - हा विषाणू 'पॅरामॉक्सोव्हायरिडी' (Paramyxoviridae) कुटुंबातील 'हेनिपाव्हायरस' (Henipavirus) या प्रजातीचा सदस्य आहे.

निपाह विषाणूचा प्रसार आणि वाहक (Transmission and Reservoirs):
• नैसर्गिक वाहक - जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), 'टेरोपॉडिडी' (Pteropodidae) कुटुंबातील 'फ्रूट बॅट्स' (Fruit Bats) म्हणजेच “फळे खाणारी वटवाघुळे” हे या विषाणूचे मुख्य नैसर्गिक वाहक आहेत.
• मध्यस्थ वाहक (Intermediate Host) - डुक्कर (Pigs) हा या आजारात मध्यस्थ वाहक म्हणून काम करतो
• मानवी प्रसार - वटवाघुळांनी चावा घेतलेली किंवा दूषित केलेली फळे खाल्ल्याने तसेच बाधीत व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने हा आजार मानवांमध्ये वेगाने पसरतो.

लक्षणे (Symptoms and Clinical Features) :
• सुरुवातीची लक्षणे - संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला फ्लूसारखी (Influenza-like) लक्षणे दिसतात. जसे की, तीव्र ताप, स्नायू दुखणे, घसा सुजणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे.
• गंभीर अवस्था - लागण गंभीर झाल्यास रुग्णाला 'ॲक्युट एन्सेफलायटीस' (Acute Encephalitis) म्हणजे मेंदूला सूज येते.
• यामुळे चक्कर येणे, मानसिक गोंधळ उडणे, कोमामध्ये जाणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.
निदान आणि चाचण्या (Diagnosis and Testing) :
• सुरक्षा पातळी- निपाह हा 'बायोसेफ्टी लेव्हल-4' (BSL-4 Pathogen) चा घातक रोगजनक आहे, ज्यामुळे याचे नमुने केवळ उच्च-सुरक्षा प्रयोगशाळांमध्येच तपासले जातात.
हंगामी धोका आणि आव्हाने (Seasonal Risk in Kerala) :
• धोकादायक कालावधी - केरळमध्ये दरवर्षी एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांत निपाहचा प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका असतो.
• कारण - या काळात झाडांना फळे येण्याचा हंगाम असतो, वटवाघुळांची हालचाल वाढते, त्यांचा प्रजननाचा काळ असतो आणि त्यांच्या विष्ठेतून किंवा लाळेतून विषाणू बाहेर पडण्याचे (Viral Shedding) प्रमाण जास्त असते.
उपचार आणि प्रतिबंध (Treatment and Prevention) :
• लस उपलब्ध नाही - मानवांसाठी किंवा प्राण्यांसाठी निपाह विषाणूवर कोणतीही अधिकृत मान्यताप्राप्त लस उपलब्ध नाही.
• उपचार पद्धती - रुग्णाला आयसोलेशनमध्ये (Isolation) ठेवून विशेष काळजी (Intensive Supportive Care) दिली जाते.
• भारताचे यश - भारताने, विशेषतः केरळने 'मोनोक्लोनल अँटीबॉडीज' (Monoclonal Antibodies) आणि 'रेमडेसिवीर' (Remdesivir) • सारख्या अँटीव्हायरल औषधांचा प्रभावी वापर करून मृत्यूदर कमी केला आहे.
• 2018 मधील 91% वरून हा मृत्यूदर 2023-25 पर्यंत सुमारे 33% वर आणण्यात यश आले आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Nipah Virus
• विषाणूचा प्रकार → झुनोटिक विषाणू (प्राण्यांकडून मानवात पसरणारा)
• विषाणूची फॅमिली व जीनस → पॅरामिक्सोव्हिरिडी फॅमिली आणि हेनिपाव्हायरस जीनस.
• नैसर्गिक वाहक → फ्रूट बॅट्स (फळे खाणारी वटवाघुळे)
• पहिल्यांदा रूगण सापडला → मलेशिया (वर्ष 1998-99)
























