
चालू घडामोडी | CSIR चा 'स्मार्ट व्हिलेज' उपक्रम

CSIR ‘Smart Village’ Initiative
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच CSIR ने मानव-मगर संघर्ष रोखण्यासाठी कोणत्या राज्यातील 'कुसूनपूर' या गावात 'स्मार्ट व्हिलेज' अंतर्गत AI तंत्रज्ञान तैनात केले आहे?
- ओडिशा
- पश्चिम बंगाल
- आंध्र प्रदेश
- तामिळनाडू
उत्तर : ओडिशा
📰 बातमी काय ?
- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत ओडिसातील 'कुसूनपूर' (Kusunpur) या गावात 'स्मार्ट व्हिलेज' उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे.

🏘️ कुसूनपूर गावाची निवड का ?
- गंभीर समस्या : ओडिशातील कुसूनपूर हे गाव भारतातील सर्वाधिक 'मानव-मगर संघर्षासाठी' (Human-Crocodile Conflict)ओळखले जाते.
- गेल्या 4 वर्षांत या गावामध्ये मगरींच्या हल्ल्यांमुळे 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
- या वारंवार होणाऱ्या जीवितहानीला थेट आळा घालण्यासाठी CSIR ने या गावाची निवड केली आहे.
🧐 'स्मार्ट व्हिलेज' उपक्रम काय आहे ?
- विज्ञान, प्रगत तंत्रज्ञान आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या (Sustainable Infrastructure) एकत्रीकरणातून ग्रामीण भागाचा कायापालट करणे, लोकांचे जीवनमान उंचावणे आणि सुरक्षा प्रदान करणे हा या उपक्रमाचा मूळ गाभा आहे.
🏛️ अंमलबजावणी संस्था (Implementing Agency):
- हा उपक्रम वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) द्वारे राबविण्यात येत आहे.
- CSIR त्यांच्या 'लॅब-टू-लँड' (Lab-to-Land Approach)दृष्टिकोनाखाली हा उपक्रम राबवत आहे म्हणजेच CSIR च्या प्रयोगशाळांमध्ये विकसित केलेले तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या उपयोगासाठी जमिनीवर उतरवले जात आहे.
🎯 प्रमुख वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान (Key Features):
🐊 AI-आधारित मगरी शोध यंत्रणा (AI-Enabled Detection System) -
- मगरी जेव्हा मानवी वस्त्यांकडे किंवा नदीकाठच्या सार्वजनिक घाटांकडे येण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा हे AI रडार/कॅमेरा तंत्रज्ञान त्यांना ओळखून गावकऱ्यांना आणि प्रशासनाला तात्काळ चेतावणी (Alerts/Alarms) जारी करेल.
- यामुळे मगरींचे हल्ले आणि जीवितहानी पूर्णपणे टाळता येईल.
🏘️ पायाभूत सुविधांचा विकास -
- गावात सुरक्षित पाण्याचे स्त्रोत, सौर ऊर्जेवर चालणारे दिवे आणि नदीकाठी सुरक्षित घाटांचे कुंपण उभारले जात आहे.
💰 आर्थिक विकास -
- तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेती, दुग्धव्यवसाय आणि स्थानिक संसाधनांवर आधारित रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
- 'स्मार्ट व्हिलेज' उपक्रमांतर्गत निवडलेले गाव → कुसूनपूर (ओडिसा)
- मुख्य समस्या → मानव-मगर संघर्ष
- तांत्रिक मदत → AI-आधारित वन्यजीव शोध आणि अलर्ट प्रणाली.
- अंमलबजावणी करणारी मुख्य संस्था → CSIR (Council of Scientific & Industrial Research).
- ध्येय → ग्रामीण सुरक्षा, गावातील पायाभूत सुविधांचा विकास
















