
चालू घडामोडी | खेत बचाओ अभियान
Khet Bachao Abhiyan
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारने जून 2026 मध्ये सुरू केलेल्या ' खेत बचाओ अभियान 'चा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे ?
- वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे रक्षण करणे
- शेतजमिनींवरील अतिक्रमणे रोखणे
- शेती योग्य जमिनीवर बांधकाम करण्यापासून रोखणे
- सेंद्रिय शेती व रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे
उत्तर : सेंद्रिय शेती व रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे
📰 बातमी काय ?
• केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देशभरात महिनाभर चालणारे 'खेत बचाओ अभियान ' (Khet Bachao Abhiyan) राबवण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
🧐 खेत बचाओ अभियान काय आहे ?
• स्वरूप - हा एक व्यापक देशव्यापी कृषी जागरूकता आणि पोहोच उपक्रम (Agricultural Awareness & Outreach Campaign) आहे, ज्याचा उद्देश शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणे आणि शेती उत्पादकता वाढवणे हा आहे.
• कालावधी - हे अभियान 1 ते 30 जून 2026 या कालावधीत संपूर्ण देशभरात राबवले जात आहे.
• आयोजक मंत्रालय - केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Agriculture and Farmers Welfare).
🤝 खेत बचाओ अभियानाचे मुख्य उद्दिष्ट :
• जमिनीची आरोग्य पत्रिका (Soil Health) आणि वैज्ञानिक शिफारशींच्या आधारे रासायनिक खतांच्या संतुलित आणि वाजवी वापराला (Judicious Use of Fertilizers) प्रोत्साहन देणे.
• शेतकऱ्यांना हवामानावर आधारित आणि प्रादेशिक गरजेनुसार कृषी सल्ले (Farm Advisories) देणे, तसेच त्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांशी थेट जोडणे.
✍️ खेत बचाओ अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features):
1) संतुलित खत व्यवस्थापन -
• माती परीक्षणावर (Soil Testing) आधारित खतांचा वापर वाढवणे.
• 'एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन' (INM - Integrated Nutrient Management) पद्धतीचा अवलंब करून सेंद्रिय, जैविक आणि हिरवळीच्या खतांच्या(Organic, bio-, and green manure) वापराला चालना देणे.
2) हवामान अनुकूल कृषी सल्ले -
• शेतकऱ्यांना पिकांची योग्य निवड, पीक विविधता (Crop Diversification), पाण्याचे व्यवस्थापन आणि हवामानाशी संबंधित जोखमींचे व्यवस्थापन यावर व्यावहारिक मार्गदर्शन करणे.
3) तळागाळातील लोकसहभाग -
• या अभियानाची अंमलबजावणी गावपातळीवर स्थानिक ग्रामपंचायती, कृषी विज्ञान केंद्रे (KVKs), भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) संस्था आणि राज्य सरकारचे कृषी विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून केली जात आहे.
4) विविध योजनांचे एकत्रीकरण -
• या अभियानांतर्गत पीएम-किसान (PM-KISAN), किसान क्रेडिट कार्ड (KCC), कडधान्ये-गळित धान्य मोहीम, ऑइल पाम मिशन, कापूस मिशन, शेती यांत्रिकीकरण आणि जलसंधारण उपक्रमांचे फायदे एकत्रितपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील.
🌳 अभियानाचे आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व (Significance) :
• जमिनीची सुपीकता टिकवणे - वैज्ञानिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे रासायनिक खतांचा अतिवापर कमी होईल, ज्यामुळे जमिनीची दीर्घकालीन सुपीकता (Soil Fertility) टिकवून ठेवता येईल.
• उत्पादन खर्चात कपात - खतांचा आणि इतर निविष्ठांचा (Inputs) योग्य प्रमाणात वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीवरील उत्पादन खर्च कमी होईल आणि नफा वाढेल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Khet Bachao Abhiyan
• अभियानाचे नाव → खेत बचाओ अभियान
• आयोजक मंत्रालय → केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
• आयोजन कालावधी → 1 ते 30 जून 2026
• मुख्य भर → संतुलित खतांचा वापर आणि जमिनीचे आरोग्य (Soil Health)
• अंमलबजावणीचे केंद्र → पंचायत-केंद्रित (गाव पातळीवरील संस्था)
• कृषी तांत्रिक साहाय्य संस्था → कृषी विज्ञान केंद्रे (KVKs) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)





















