Raja Rammohan Roy: The Father of Modern India
📚 Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास - समाजसुधारक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राजा राममोहन रॉय यांनी आधुनिक पाश्चात्य विज्ञान आणि भारतीय शिक्षण पद्धतीचा मेळ घालण्यासाठी वर्ष 1825 मध्ये 'वेदान्त कॉलेज'ची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात केली होती ?
1. मुंबई
2. कलकत्ता
3. मद्रास
4. दिल्ली
उत्तर : कलकत्ता
जन्म :
• राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगर ( राधानगरी) या गावी एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला होता.
नोकरी आणि व्यवसाय :
• 1809 ते 1814 या काळात त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या महसूल विभागात (Revenue Department) आपली सेवा दिली.
• त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जॉन डिग्बी (John Digby) आणि वुडफोर्ड (Woodforde) यांचे वैयक्तिक दिवाण म्हणून काम केले.
बहुभाषिक तज्ज्ञ (Gifted Linguist) :
• एक प्रतिभावान भाषाप्रभू होते. त्यांना संस्कृत, पर्शियन (फारसी), अरबी, इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक आणि हिब्रू यांसह 12 पेक्षा जास्त भाषांचे उत्कृष्ट ज्ञान होते.
निधन :
• 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर असताना 'Meningitis' (मेंदूज्वर) या आजाराने ब्रिटनमधील ब्रिस्टॉलजवळील स्टॅपल्टन (Stapleton) येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ब्रिटिश सरकारने ब्रिस्टॉलमधील एका रस्त्याला ‘Raja Rammohan Way’ असे नाव दिले आहे.

राजा राममोहन रॉय - महत्त्वाच्या पदव्या आणि गौरव :
• आधुनिक भारताचे जनक - गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना 'आधुनिक भारताचे जनक' (Father of Modern India) ही पदवी दिली.
• भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत - अनेक इतिहासकार त्यांना भारतीय प्रबोधनाचे (Indian Renaissance) प्रमुख अग्रदूत मानतात.
• 'राजा' पदवी - मुघल सम्राट अकबर दुसरा (Akbar II) याने राममोहन रॉय यांना ‘राजा’ ही पदवी दिली होती.

🤔 राजा राममोहन रॉय - तात्त्विक व धार्मिक विचारसरणी (Philosophy):
एकेश्वरवाद (Monotheism) -
• राममोहन रॉय हे एकेश्वरवादाचे (एकच देव मानणे) खंदे पुरस्कर्ते होते.
• हाच वेदांत तत्त्वज्ञानाचा मूळ पाया आहे आणि जगातील सर्व धार्मिक ग्रंथांच्या केंद्रस्थानी एकेश्वरवादच आहे, असा त्यांचा दृढ विश्वास होता.
बुद्धिप्रामाण्यवाद (Rationalism) -
• राजा राममोहन रॉय हे बुद्धिप्रामाण्यवादी विचारांनी अत्यंत प्रभावित होते.
• त्यांनी स्पष्ट केले की वेदांत हा तर्कावर (Reason) आधारित आहे आणि जर मानवी तर्क किंवा बुद्धीला एखादी गोष्ट पटत नसेल, तर शास्त्रांपेक्षा बुद्धीला प्राधान्य देऊन जुन्या शास्त्रवचनांचा त्याग करणेही न्याय्य आहे.
युनिटेरियनिझम (Unitarianism) -
• ख्रिश्चन धर्मातील 'युनिटेरियन' (Unitarian) विचारसरणीने विशेष आकर्षित झाले होते आणि वेगवेगळ्या संस्कृतींमधील सर्वोत्तम गोष्टींचा स्वीकार करण्याच्या बाजूने होते.
• ख्रिश्चन धर्मातील 'युनिटेरियन' (Unitarian) विचारसरणी म्हणजे अशी धार्मिक चळवळ जी पारंपारिक ख्रिश्चन धर्मातील 'त्रैक्य' (Trinity -तीन देव) हा सिद्धांत नाकारते आणि देव (ईश्वर) एकच आहे, यावर विश्वास ठेवते.
📰✍️ राजा राममोहन रॉय: प्रमुख पुस्तके आणि ग्रंथ (Books)
1)तुहफत-उल-मुवाहिद्दीन
• भाषा: फार्सी (प्रस्तावना अरबी भाषेत).
• अर्थ: 'एकेश्वरवाद्यांना भेट' (A Gift to Monotheists).
• हा त्यांचा पहिला प्रकाशित ग्रंथ असून यात त्यांनी मूर्तीपूजा, बहुदेववाद आणि पुरोहितशाहीवर कडक टीका केली आहे.
2) वेदान्त ग्रंथ -
• भाषा: बंगाली.
• प्राचीन उपनिषदे आणि वेदांचे त्यांनी बंगालीत भाषांतर केले. हिंदू धर्म मूळचा एकेश्वरवादीच आहे, हे त्यांनी याद्वारे सिद्ध केले.
3) 'Abridgement of the Vedant' (अब्रिजमेंट ऑफ वेदान्त) :
• भाषा: इंग्रजी
• पाश्चात्य जगाला भारतीय वेदांचे शुद्ध आणि मूळ स्वरूप समजावे यासाठी त्यांनी वरील वेदान्त ग्रंथाचा हा इंग्रजी अनुवाद केला.

वृत्तपत्रे –
• संवाद कौमुदी (Sambad Kaumudi) - 1821 मध्ये त्यांनी 'संवाद कौमुदी' हे बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले.
• कोणत्याही भारतीयाने भारतीय भाषेत सुरू केलेले हे पहिलेच वृत्तपत्र मानले जाते. यातून त्यांनी सती प्रथा निर्मूलन, बालविवाह विरोध आणि स्त्री शिक्षणाचा जोरदार प्रसार केला.
सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा (Social & Educational Reforms):
• सती प्रथा बंदी (Abolition of Sati) - त्यांनी 1818 मध्ये सती प्रथेविरुद्ध तीव्र संघर्ष सुरू केला.
• कोणताही धर्म विधवांना जिवंत जाळण्याची परवानगी देत नाही, हे त्यांनी पवित्र ग्रंथांचे दाखले देऊन सिद्ध केले आणि मानवतेला आव्हान दिले.
• त्यांनी स्वतः स्मशानभूमींना भेटी दिल्या, सती प्रथा थांबवण्यासाठी दक्षता गट स्थापन केले आणि सरकारकडे प्रति-याचिका दाखल केल्या.
• त्यांच्या या प्रयत्नांचे फलित म्हणून ब्रिटिश सरकारने 1829 च्या नियम द्वारे (Government Regulation in 1829) सती प्रथा कायद्याने बेकायदेशीर आणि मोठा गुन्हा घोषित केली. (मंजूर करणारा गव्हर्नर जनरल: लॉर्ड विल्यम बेंटिक)
महिलांचे हक्क -
• त्यांनी बहुपत्नीत्व (Polygamy), बालविवाह आणि जातीव्यवस्थेच्या कडक बंधनांना तीव्र विरोध केला.
• स्त्रियांना कनिष्ठ सामाजिक दर्जा देणाऱ्या अंधश्रद्धांवर हल्ला चढवून त्यांनी स्त्रियांना वारसाहक्क आणि मालमत्तेचा अधिकार देण्याची मागणी केली.
• आंतरजातीय विवाह, स्त्रियांचे शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाच्या बाजूने होते.
वेदांत कॉलेज (1825) -
• रीजा राममोहन रॉय यांनी 1825 मध्ये वेदांत कॉलेज' ची स्थापना केली, जिथे भारतीय पारंपरिक अभ्यासासोबतच पाश्चात्त्य सामाजिक आणि भौतिक विज्ञानाचे (Western Physical Sciences) प्रगत अभ्यासक्रम शिकवले जात असत.
• त्यांनी बंगाली व्याकरणाचे पुस्तक संकलित करून आधुनिक बंगाली गद्य शैलीचा पाया रचला.
राजकीय भूमिका आणि मागण्या (Political Stand) :
• जमीनदारांचा विरोध - एक राजकीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी बंगालमधील जमीनदारांच्या जुलमी व जाचक पद्धतींचा तीव्र निषेध केला आणि शेतकऱ्यांसाठी कमाल शेतसारा (Maximum Rents) निश्चित करण्याची मागणी केली.
• करांना विरोध - त्यांनी करमुक्त जमिनींवर ब्रिटिश सरकारने लावलेले कर रद्द करण्याची मागणी केली.
• व्यापारी हक्क संपुष्टात आणणे - त्यांनी भारतीय मालावरील परदेशी निर्यात शुल्क (Export Duties) कमी करण्याची आणि ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी हक्क पूर्णपणे संपुष्टात आणण्याची मागणी केली.
• प्रशासनाचे भारतीयीकरण - त्यांनी प्रशासकीय सेवांमधील उच्च पदांचे 'भारतीयीकरण' (Indianisation of Superior Services) करण्याची आणि कार्यकारी यंत्रणेपासून न्यायव्यवस्था वेगळी करण्याची (Separation of executive from judiciary) मागणी केली.
• न्यायिक समानता - त्यांनी भारतीय आणि युरोपियन लोकांमध्ये न्यायिक समानता आणून सर्व खटले 'ज्युरी पद्धतीद्वारे' (Trials by Jury) चालवण्याची आग्रही मागणी केली.
राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था:
A) आत्मीय सभा (Atmiya Sabha):
स्थापना - 1814 मध्ये कलकत्ता (कोलकाता) येथे स्थापना.
कार्य - वेदांताच्या एकेश्वरवादी आदर्शांचा प्रचार करणे आणि मूर्तीपूजा, जातीव्यवस्थेची कडक बंधनं, अर्थहीन धार्मिक विधी आणि इतर सामाजिक वाईट प्रथांवरिुद्ध मोहीम चालवणे.
B) ब्राह्मो समाज (Brahmo Samaj):
स्थापना - 1828 मध्ये त्यांनी 'ब्राह्मो सभा’ स्थापन केली, जिचे नंतर ‘ब्राह्मो समाज’ असे नामकरण करण्यात आले.
तत्त्वज्ञान:
• शाश्वत एकाच देवाची पूजा करणे हा मुख्य हेतू होता.
• पुरोहितशाही, मूर्तीपूजा, कर्मकांड आणि प्राण्यांचे बळी देण्याच्या प्रथांना यात तीव्र विरोध होता.
यात केवळ प्रार्थना, ध्यान आणि धर्मग्रंथांचे वाचन यावर लक्ष केंद्रित केले गेले आणि सर्व धर्मांच्या एकतेवर (Unity of all Religions) विश्वास ठेवण्यात आला.
महत्त्व:
• ही आधुनिक भारतातील पहिली बौद्धिक सुधारणा चळवळ होती, ज्याने देशात बुद्धिप्रामाण्यवाद आणि प्रबोधन घडवून आणले, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा पुढील राष्ट्रीय चळवळीला (Nationalist Movement) झाला.
विभाजन (1866):
• अंतर्गत मतभेदांमुळे 1866 मध्ये ब्राह्मो समाजात फूट पडून दोन भाग झाले:
• भारतीय ब्राह्मो समाज (Brahmo Samaj of India) : केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली.
• आदी ब्राह्मो समाज (Adi Brahmo Samaj) : देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली.

ब्राह्मो समाजाचे प्रमुख नेते:
देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, पं. शिवनाथ शास्त्री आणि रवींद्रनाथ टागोर हे या चळवळीतील अग्रगण्य नेते होते.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स - राजा राममोहन रॉय
• जन्म → 22 मे 1772 राधानगर (हुगळी जिल्हा, पश्चिम बंगाल)
• निधन → 27 सप्टेंबर 1833 (ब्रिस्टल, ब्रिटन) — आजार: मेंदूज्वर
• विचारसरणी → एकेश्वरवाद (Monotheism) आणि बुद्धीप्रामाण्यवाद (Rationalism)
• योगदान→ वर्ष 1829 चा सती बंदी कायदा (लॉर्ड विल्यम बेंटिक)
• बंगाली साप्ताहिक → संवाद कौमुदी (1821 - पहिले स्वदेशी साप्ताहिक).
• वेदान्त कॉलेज → वर्ष 1825 (कलकत्ता) — पाश्चात्य विज्ञान + भारतीय शिक्षण.
• आत्मीय सभा → वर्ष 1814 (कलकत्ता)
• ब्राह्मो समाज → 1828 (कलकत्ता) — पुरोहितशाही व कर्मकांडाविरुद्ध पहिली बौद्धिक चळवळ.
