
चालू घडामोडी, 20 जून 2024

नविन पोस्ट ऑफिस ॲक्ट, 2023 लागू
Subject : GS- राज्यशास्त्र (Polity)
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) नवीन पोस्ट ऑफिस ॲक्ट 2023 लागू झाल्यानंतर याकायद्याने खालील पैकी कोणत्या कायद्याची जागा घेतली ?
1. भारतीय पोस्ट ऑफिस कायदा, 1858
2. भारतीय पोस्ट ऑफिस कायदा, 1898
3. भारतीय पोस्ट ऑफिस कायदा, 1928
4. भारतीय पोस्ट ऑफिस कायदा, 1958
उत्तर : भारतीय पोस्ट ऑफिस कायदा, 1898

• नवीन भारतीय टपाल कायदा, पोस्ट ऑफिस ॲक्ट, 2023 मधील तरतुदी 18 जून 2024 पासून लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली.
• या कायद्यामुळे भारतीय पोस्ट ऑफिस कायदा 1898 हा रद्द करण्यात आला.
• उद्देश : नागरिकांना मध्यस्थी ठेवून सेवा प्रदान करण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचावा आणि राहणीमानात सुसह्यता वाढावी यासाठी एक सोपी कायदेशीर चौकट प्रदान करणे हा या नवीन कायद्याचा उद्देश आहे.
• पोस्ट ऑफिस कायदा 2023 मध्ये " कमाल शासन आणि किमान सरकारला " प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही दंडात्मक तरतूद विहित केलेली नाही.
• पोस्ट ऑफिस बिल, 2023 हे 10 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले आणि 4 डिसेंबर 2023 रोजी राज्यसभेने ते बिल पास केले.
• नंतर हे विधेयक 18 डिसेंबर २०२३ रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले.
• 24 डिसेंबर 2023 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी या बिलाला आपली संमती दिली आणि बिलाचे कायद्यात रूपांतर झाले.
• (नोट - लोकसभेत आणि राज्यसभेत बिल मंजूर झाल्यानंतर ते बिल राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी जाते राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर बिलाचे कायद्यात रूपांतर होते.)
असमी सबमशीन गन
Subject : GS- राष्ट्रीय घडामोडी - संरक्षण (Defence)
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) असमी सबमशीन गन बद्दल असत्य विधान निवडा.
1. या गनची निर्मिती हैदराबाद येथील लोकेश मशीन लिमिटेड या कंपनीने केली आहे.
2. भारतीय लष्करात दाखल होणारे हे पहिलेच स्वदेशी बनावटीचे आणि तयार केलेले शस्त्र आहे.
3. असमी ही 5 किलो पेक्षा जास्त वजनाची सबमशीन गन आहे.
4. या गनची डिझाईन DRDO ने बनवली आहे.
उत्तर : असमी ही 5 किलो पेक्षा जास्त वजनाची सबमशीन गन आहे हे चुकीचे विधान आहे.
असमी ही २.४ किलो पेक्षा कमी वजनाची सिंगल युनिबोडी 9X19 मिमी कॅलिबर सबमशीन गन आहे.

असमी सबमशीन गन :
• भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने 4.26 कोटी रुपयांच्या 550 स्वदेशी बनावटीच्या, विकसित आणि निर्मित असमी (ASMI) सबमशीन गनची ॲार्डर दिली आहेत.
• असामी गन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे तसेच याची निर्मिती देखील भारतात झालेली आहे.
• असामी गन डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या पुणे येथील प्रयोगशाळा शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE) ने भारतीय सैन्याच्या सहकार्याने डिझाइन केले आहे.
• ही डिझाईन लोकेश मशीन लिमिटेड या हैद्राबाद येथील मशीन बनवणाऱ्या कंपनीला उत्पादनासाठी सुपूर्द करण्यात आली.
• भारतीय लष्करात दाखल होणारे हे पहिलेच स्वदेशी बनावटीचे आणि तयार केलेले शस्त्र आहे.
• असमी (ASMI) हा अस्मिता या शब्दाचा शॅार्ट फॅार्म आहे याचा अर्थ अभिमान असा होतो.
असमी (ASMI) सब मशीन गन ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
• असमी ही २.४ किलो पेक्षा कमी वजनाची सिंगल युनिबोडी 9X19 मिमी कॅलिबर सबमशीन गन आहे.
• या सब मशीन गनची मॅक्झिन क्षमता 32 राउंड आहे आणि ही गन 800 राऊंड प्रति मिनिट या वेगाने फायर करू शकते.
जागतिक निर्वासित दिन
Subject : GS- दिनविशेष
• दरवर्षी 20 जून रोजी जगभरात जागतिक निर्वासित दिन साजरा केला जातो.
• युद्ध, सामाजिक वाद, नैसर्गिक आपत्ती यामुळे स्वतःचे घर सोडून दुसऱ्या देशात जाणाऱ्या निर्वासितांच्या भयानक वास्तवावर प्रकाश टाकण्यासाठी आणि अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने नियुक्त केलेल्या हा आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पहिला जागतिक निर्वासित दिवस केव्हा साजरी करण्यात आला ?
1. 20 जून 1990
2. 20 जून 1998
3. 20 जून 2001
4. 20 जून 2008
उत्तर : 20 जून 2001

निर्वासित म्हणजे काय ?
• स्वच्छ स्वतःच्या देशात होणारा छळ किंवा जीविताचा धोका त्यामुळे स्वतःचा देश सोडून स्थलांतर करणाऱ्या लोकांना निर्वासिता असे म्हणतात.
• (उदाहरणार्थ एखाद्या देशात जर दोन धर्मातील गटांमध्ये वाद झाले तर तेथील काही लोकांना जीवाचा धोका असतो ते लोक देश सोडण्यास भाग पाडले जातात. म्यानमार मधील रोहिंग्या मुस्लिम लोक भारतात आणि बांगलादेशात निर्वासित झाले आहे.)
निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्र उच्चायुक्त कार्यालय :
United Nation High Commission for Refugees (UNHCR)
• ही संघटना जगभरातील निर्वासित लोकांचे संरक्षण करते आणि त्यांना घरी परत जाणे किंवा त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत कार्य करते.
• दुसऱ्या महायुद्धात लाखो लोकांनी घरे गमावली त्यांना मदत करण्यासाठी 1950 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे (UNGA) या संघटनेची निर्मिती करण्यात आली.
• या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांना 1954 आणि 1981 चा शांततेचा नोबल पुरस्कार देण्यात आला.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे ट्रेंड बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तो खालीलपैकी कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
1. न्यूझीलंड
2. ऑस्ट्रेलिया
3. दक्षिण आफ्रिका
4. इंग्लंड
उत्तर : न्यूझीलंड
ट्रेंड बोल्ट हा हा न्यूझीलंडच्या डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. (Left Hand Fast Bowler)