
चालू घडामोडी 19, जून 2024

घोडबंदर किल्ला
Ghodbunder Fort
Subject : GS- मराठ्यांचा इतिहास - किल्ले
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेला घोडबंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो ?
1. पुणे
2. नाशिक
3. ठाणे
4. सातारा
उत्तर : ठाणे

बातम्यांमध्ये : ठाणे येथील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्यावर चालू असलेल्या संवर्धन आणि जिर्णोद्धाराच्या कामात जमिनीच्या आतील थरांच्या खाली स्थित एक लपलेला चेंबर सारखी रचना सापडली आहे. याद्वारे मराठ्यांच्या इतिहासातील काही महत्त्वाचे पैलू उलगडण्यास मदत होणार आहे.
घोडबंदर किल्ल्याबद्दल स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती :
• महाराष्ट्रातील ठाणे येथील घोडबंदर गावातील हा एक डोंगरी किल्ला आहे.
• हा किल्ला उल्हास नदीच्या काठावर वसलेला आहे.
• हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता आणि 1730 मध्ये या किल्ल्याचे काम पूर्ण झाले होते.
• या किल्ल्याचा वापर पोर्तुगीज अरबांसोबत घोड्यांच्या व्यापारासाठी करत असे म्हणून या किल्ल्याला घोडबंदर असे नाव पडले.
• पोर्तुगीजांनी कोकण किनारपट्टीवरील सागरावर आपली सत्ता राखण्यासाठी जे किल्ले बांधले त्यापैकी हा एक महत्त्वाचा किल्ला आहे.
• पुढे मराठ्यांनी हा किल्ला काबीज करून स्वराज्यामध्ये आणला.
• 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्याचा जिल्हा मुख्यालय म्हणून वापर करण्यास सुरुवात केली.
प्रश्न) बातम्यांमध्ये असलेला घोडबंदर किल्ला हा कोणत्या नदीच्या काठी आहे ?
1. गोदावरी
2. उल्हास
3. माण
4. कुंडलिका
उत्तर : उल्हास

साहित्य अकादमी पुरस्कार 2024
Subject : GS- साहित्य पुरस्कार
• साहित्य अकादमी पुरस्कार 2024 नुकताच जाहीर झाला.

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2024 चा साहित्य अकादमी पुरस्कार बालसाहित्य कोणाला दिला गेला ?
1. भारत सासणे
2. किरण गुरव
3. श्रीकांत उम्रीकर
4. डॅा. शरण कुमार लिंबाळे
उत्तर : भारत सासणे
प्रश्न ) देविदास सौदागर यांची ------ कादंबरीला 2024 चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
1. समशेर आणि भूत बंगला
2. उजव्या सोंडेच्या बाहुल्या
3. कदाचित अजूनही
4. उसवण
उत्तर : उसवण
साहित्य अकादमी पुरस्कार 2024 :
बालसाहित्य चा पुरस्कार भारत सासणे यांच्या " समशेर आणि भूत बंगला " या पुस्तकाला जाहीर झाला. तर युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या " उसवण " या कादंबरीला मिळाला.

साहित्य अकादमी पुरस्कार :
• 1955 पासून दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट कलाकृतींसाठी दिला जातो.
• साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांमधील साहित्यांना दिला जातो.
• भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या 22 भाषांबरोबर इंग्रजी आणि राजस्थानी या भाषांमध्ये देखील साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो.
• पुरस्काराचे स्वरूप : ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
• ज्ञानपीठ पुरस्कारानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा देशातील दुसरा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे.
साहित्य अकादमी बद्दल महत्त्वाची माहिती :
• 12 मार्च 1954 रोजी भारत सरकारने साहित्य अकादमीचे औपचारिक उद्घाटन केले.
• साहित्य अकादमी जरी सरकारने स्थापन केली असली तरी अकादमी स्वायत्त संस्था (Autonomous Organisation) म्हणून काम करते.
• सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत साहित्य अकादमीची सोसायटी म्हणून नोंदणी केली आहे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
1. साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांमधील साहित्यांना दिला जातो.
2. सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत साहित्य अकादमीची सोसायटी म्हणून नोंदणी केली आहे.
3. साहित्य अकादमी पुरस्कार हा देशातील दुसरा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे.
4. वरील पैकी सर्व
उत्तर : वरील पैकी सर्व
नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार
Subject : GS- साहित्य पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) चित्रपटांमधील योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले ?
1. अशोक सराफ
2. कमल हसन
3. रजनीकांत
4. विनोद गणात्रा
उत्तर : विनोद गणात्रा

• प्रख्यात बालचित्रकार निर्माते विनोद गणात्रा यांना चित्रपटांमधील योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिष्ठित " नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्काराने " सन्मानित करण्यात आले.
• हा पुरस्कार त्यांना बाल चित्रपटातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल देण्यात आला.
• नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणारे विनोद गणात्रा हे पहिले भारतीय ठरले.
• विनोद गणात्रा यांनी 36 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले आहेत.
• भारत-पाकिस्तान सीमेवर आधारीत असलेल्या हरुन अरुण या गुजराती चित्रपटाला 26 व्या शिकागो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात "लिव्ह उलमन पीस अवॉर्ड" मिळाला.
• प्रतिष्ठित ' लिव्ह उलमन शांतता पुरस्कार ' जिंकणारे विनोद गणात्रा हे एकमेव भारतीय आहेत.
• दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले आहे.