
चालू घडामोडी 26, मार्च 2025 | ज्येष्ठ नागरिक आयोग | Senior Citizens Commission

ज्येष्ठ नागरिक आयोग
Senior Citizens Commission
Subject : GS - राज्यशास्त्र - कायदा, आयोग, वैधानिक संस्था
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1. उत्तर प्रदेश
2. महाराष्ट्र
3. गुजरात
4. केरळ
उत्तर : केरळ
बातमी काय आहे ?
"केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग विधेयक" केरळ विधानसभेत मंजूर करण्यात आले.
केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोगा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले.
• केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग कायदा, 2025 अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था (Statutory Body) आहे.
• हा आयोग ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक चांगले पुनर्वसन, सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोगाचे उद्दिष्ट्ये कोणती ?
• ज्येष्ठ नागरिकांचे हक्कांचे संरक्षण, कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरण सुनिश्चित करणे
• प्रगतीशील आणि समावेशक केरळच्या उभारणीत ज्येष्ठ नागरिकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणे.
केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोगाचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि कार्ये कोणती ?
• धोरण सल्लागार : हा आयोग ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे रक्षण करेल आणि ज्येष्ठ नागरिकां संबंधित धोरण ठरवण्यासाठी सल्लागार संस्था म्हणून काम करेल.
• अहवाल : धोरण सुधारणेसाठी राज्य सरकारला नियमित अहवाल आणि सल्ला सादर करते.
• तक्रारींचे निराकरण : वृद्धांमधील दुर्लक्ष, गैरवापर, शोषण आणि एकाकीपणाशी संबंधित समस्या हाताळते.
• कायदेशीर मदत आणि संरक्षण : गैरवापर किंवा मालमत्तेच्या वादांना तोंड देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर मदत मिळण्यास मदत करणे.
• कौशल्याचा वापर : सामाजिक फायद्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या कौशल्यांचा आणि ज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
• जागरूकता मोहिमा : वृद्धांचे हक्क आणि कुटुंबांच्या जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबवणे.