
चालू घडामोडी | ‘चक्रा’ उत्कृष्टता केंद्र कोणी सुरू केले ?

Who started the 'Chakra' Centre of Excellence ?
Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ‘चक्रा’ (CHAKRA) नावाचे उत्कृष्टता केंद्र कोणत्या उद्देशाने सुरू केले ?
1. कृषी कर्ज वाढवण्यासाठी
2. सूक्ष्म वित्त मजबूत करण्यासाठी
3. उदयोन्मुख (Sunrise) क्षेत्रांना वित्तपुरवठा मजबूत करण्यासाठी
4. डिजिटल पेमेंट्स वाढवण्यासाठी
उत्तर : उदयोन्मुख (Sunrise) क्षेत्रांना वित्तपुरवठा मजबूत करण्यासाठी
बातमी काय ?
• State Bank of India (SBI) ने ‘चक्रा’ (CHAKRA) नावाचे उत्कृष्टता केंद्र सुरू केले आहे.
• हे केंद्र भविष्यात झपाट्याने वाढ होणाऱ्या आणि मोठ्या गुंतवणुकीची गरज असलेल्या क्षेत्रांना कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
• यामुळे बँकेची जोखीम ओळखण्याची आणि योग्य प्रकारे कर्ज रचना करण्याची क्षमता वाढणार आहे.
‘चक्रा’ (CHAKRA) म्हणजे काय ?
• ‘CHAKRA’ हे State Bank of India (SBI) चे एक विशेष ज्ञानकेंद्र (Centre of Excellence) आहे.
✍️ या केंद्रामार्फत -
• नवीन आणि तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रांचा अभ्यास केला जाईल,
• त्यांची जोखीम समजून घेतली जाईल आणि
• त्या क्षेत्रांसाठी योग्य कर्ज योजना तयार केल्या जातील.
उदयोन्मुख (Sunrise) क्षेत्रे म्हणजे काय ?
• Sunrise क्षेत्रे म्हणजे अशी क्षेत्रे जी सध्या विकसित होत आहेत आणि भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढ अपेक्षित आहे.
• या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक लागते आणि त्यामध्ये जोखीमही जास्त असते.
कोणत्या 8 क्षेत्रांवर लक्ष ?
(8 Sunrise Sectors) :
1. अक्षय ऊर्जा (Renewable Energy)
2. प्रगत बॅटरी व ऊर्जा साठवण (Advanced Cell Chemistry & Battery Storage)
3. इलेक्ट्रिक वाहने (Electric Mobility)
4. हरित हायड्रोजन (Green Hydrogen)
5. अर्धसंवाहक उद्योग (Semiconductors)
6. कार्बन उत्सर्जन कमी करणे (Decarbonisation)
7. स्मार्ट पायाभूत सुविधा (Smart Infrastructure)
8. डेटा सेंटर पायाभूत सुविधा (Data Centre Infrastructure)

‘चक्रा’ (CHAKRA) याची गरज का होती ?
• उदयोन्मुख (Sunrise) क्षेत्रांमध्ये प्रकल्प खर्च खूप मोठा असतो.
• पारंपरिक कर्ज पद्धती सर्व वेळ योग्य ठरत नाहीत.
• दीर्घकालीन आणि हरित वित्तपुरवठ्याची गरज असते.
✍️ म्हणूनच SBI ने तज्ज्ञ अभ्यास आणि सुरक्षित कर्ज रचना करण्यासाठी हे केंद्र सुरू केले.
‘चक्रा’ (CHAKRA) ची वैशिष्ट्ये :
• क्षेत्रनिहाय अहवाल आणि श्वेतपत्रिका प्रकाशित केल्या जातील.
• उद्योग व गुंतवणूकदारांशी चर्चा केली जाईल.
• प्रगत जोखीम मूल्यांकन पद्धती वापरल्या जातील.
• गरजेनुसार कर्ज रचना (Tailor-made financing) केली जाईल.
• विविध वित्तीय संस्था आणि तज्ज्ञ संस्थांसोबत सहकार्य केले जाईल.
आर्थिक महत्त्व :
• 2030 पर्यंत या क्षेत्रांमध्ये सुमारे ₹100 लाख कोटी गुंतवणुकीची अपेक्षा आहे.
• भारताच्या हरित ऊर्जा आणि हवामान धोरणाला चालना मिळेल.
• दीर्घकालीन औद्योगिक विकासासाठी मदत होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : ‘चक्रा’ (CHAKRA)
• सुरू केले - SBI ने
• उद्देश — Sunrise क्षेत्रांना मजबूत वित्तपुरवठा
• लक्ष — 8 उदयोन्मुख व तंत्रज्ञानाधारित क्षेत्रे
• 2030 पर्यंत अपेक्षित गुंतवणूक — ₹100 लाख कोटी
• भर — हरित ऊर्जा व हवामान वित्त
• पद्धत — जोखीम विश्लेषण + विशेष कर्ज रचना



























