
चालू घडामोडी | डिजिटल चलनाला अधिकृत मान्यता कोणत्या देशाने दिली ?

Which country officially recognized Digital Currency ?
Subject : GS - अर्थशास्त्र, जागतिक घडामोडी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, USD-backed Stablecoin (USDU) या डिजिटल चलनाला अधिकृत मान्यता कोणत्या देशाच्या केंद्रीय बँकेने दिली ?
1. भारत
2. संयुक्त अरब अमिराती
3. कतार
4. सिंगापूर
उत्तर : संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates)
📰 बातमी काय ?
• Central Bank of the United Arab Emirates ने पहिल्यांदाच USD-backed Stablecoin (USDU) ला अधिकृत मंजुरी दिली आहे.
कोणत्या देशाने मंजुरी दिली ? त्याचा फायदा काय ?
• संयुक्त अरब अमिराती च्या सेंट्रल बँकने ही मंजुरी दिली.
• ही मंजुरी Payment Token Services Regulation अंतर्गत देण्यात आली असून,
• यामुळे डिजिटल चलनांना UAE मध्ये कायदेशीर आणि नियंत्रित ओळख मिळाली आहे.
• USDU Stablecoin हा Universal Digital या कंपनीकडून जारी करण्यात आला आहे.
• ही कंपनी अबू धाबी ग्लोबल मार्केट (Abu Dhabi Global Market) अंतर्गत नियंत्रित असून,
• UAE केंद्रीय बँकेत नोंदणीकृत पहिली Foreign Payment Token Issuer ठरली आहे.
Stablecoin (USDU) म्हणजे नेमके काय ?
• USD बॅक हा स्टेबलकॅाईन हा क्रिप्टोकरन्सी म्हणजेच एक डिजिटल चलनाचा प्रकार आहे,
• जो 1 : 1 प्रमाणात US Dollar शी जोडलेला आहे.
• म्हणजेच, एक USDU टोकन = एक अमेरिकन डॉलर.
• यामुळे सामान्य क्रिप्टोकरन्सीसारखे किंमतीत मोठे चढउतार होत नाहीत.
• कारण प्रत्येक टोकनमागे प्रत्यक्ष अमेरिकन डॉलर (US Dollar) राखीव ठेवलेले असतात.
⚙️ ही मंजुरी महत्त्वाची का आहे ?
• आतापर्यंत Stablecoin हे बहुतेक वेळा खाजगी आणि कमी नियमन असलेले होते.
• यामुळे फसवणूक, मनी लॉन्डरिंग आणि ग्राहक संरक्षणाचे धोके होते.
• UAE केंद्रीय बँकेने प्रथमच Stablecoin ला -
➡️ कठोर नियामक चौकटीत आणले,
➡️ ब्लॅाकचेन (Blockchain) तंत्रज्ञानाला कायदेशीर आधार दिला,
➡️ आणि डिजिटल इकोनॅामी (Digital Economy) कडे स्पष्ट दिशा दाखवली.
🌍 संयुक्त अरब अमिराती :
• संयुक्त अरब अमिराती हा अरबी द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेला 7 अमिरातींचा संघ आहे.
• हा देश तेल, जागतिक वित्त, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो.
• याची राजधानी अबूधाबी असून तीच राजकीय व तेल उद्योगाचे केंद्र आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• USDU = USD-backed Stablecoin (1 : 1 USD शी जोडलेले)
• मंजुरी देणारी संस्था : UAE Central Bank
• नियमन : Payment Token Services Regulation
• जारी करणारी कंपनी : Universal Digital
• नियंत्रक क्षेत्र : Abu Dhabi Global Market (ADGM)
• महत्त्व : Regulated Digital Currency Ecosystem कडे मोठे पाऊल

















































