
चालू घडामोडी | यंत्र इंडिया लिमिटेडला 'मिनीरत्न' श्रेणी-I दर्जा

Miniratna Status for Yantra India Limited
Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला 'मिनीरत्न' श्रेणी-I दर्जा मंजूर केला ?
1. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
2. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
3. यंत्र इंडिया लिमिटेड
4. माझगाव डॉक शिपबिल्डर्स
उत्तर : यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited)
बातमी काय ?
• संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) ला 'मिनीरत्न' श्रेणी-I दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे.
• अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत सरकारी संस्था ते नफा कमावणारी कंपनी अशी वाटचाल करणाऱ्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील या उपक्रमाचे (DPSU) त्यांनी अभिनंदन केले.

यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) ला 'मिनीरत्न' श्रेणी-I दर्जा का देण्यात आला ?
• सरकार काही सरकारी कंपन्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीच्या आधारे अधिक स्वायत्तता देते.
• ज्या कंपन्या सातत्याने नफा कमावतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, अशा कंपन्यांना 'मिनीरत्न' (Miniratna) दर्जा दिला जातो.
• यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited) ने हे निकष पूर्ण केल्यामुळे तिला 'मिनीरत्न' श्रेणी-I ( Miniratna Category-I) दर्जा देण्यात आला आहे.
'मिनीरत्न' योजनेची सुरुवात कधी आणि का झाली ?
• भारत सरकारने ऑक्टोबर 1997 मध्ये 'मिनीरत्न' योजना सुरू केली.
• यामागचा उद्देश असा होता की, -
➡️ चांगली कामगिरी करणाऱ्या सरकारी कंपन्यांना निर्णय घेण्याचे अधिक अधिकार द्यावेत, जेणेकरून त्या जलद आणि प्रभावीपणे काम करू शकतील.
'मिनीरत्न' दर्जाचे दोन प्रकार आहेत :
• 'मिनीरत्न' श्रेणी-I (Miniratna Category-I) → जास्त अधिकार
• 'मिनीरत्न' श्रेणी-II (Miniratna Category-II) → मर्यादित अधिकार
'मिनीरत्न' दर्जासाठी आवश्यक अटी कोणत्या ?
• मागील 3 वर्षे सलग नफा असणे
• कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असणे
• सरकारचे कर्ज किंवा व्याज थकवलेले नसणे
• सरकारी अनुदानावर अवलंबून नसणे
• संचालक मंडळात स्वतंत्र संचालक असणे
✍️ यासोबतच 'मिनीरत्न' श्रेणी-I (Category-I) साठी विशेष अट :
→ मागील 3 पैकी किमान एका वर्षात ₹30 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त नफा
'मिनीरत्न' श्रेणी-I दर्जा मिळाल्यावर काय फायदा होतो ?
भांडवली खर्च :
• या दर्जामुळे कंपनीला सरकारची परवानगी न घेता ₹500 कोटीपर्यंत भांडवली खर्च करता येतो.
• याचा उपयोग नवीन प्रकल्प सुरू करणे, यंत्रसामग्री खरेदी, कारखान्यांचे आधुनिकीकरण यासाठी होतो.
इतर कंपन्यांसोबत काम करण्याचा अधिकार :
• कंपनीला संयुक्त प्रकल्प सुरू करता येतात
• नवीन सहाय्यक कंपन्या स्थापन करता येतात - यामुळे विस्तार जलद होतो.
कर्मचारी व्यवस्थापन :
• कंपनी स्वतः प्रशिक्षण, स्वेच्छानिवृत्ती योजना, बदली व नियुक्ती यासंबंधी निर्णय घेऊ शकते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : मिनीरत्न' श्रेणी कंपनी
• मिनीरत्न योजना सुरू : 1997
• मिनीरत्न दर्जा → नफा कमावणाऱ्या सरकारी कंपन्यांना (CPSE) ला दिला जातो
• दोन प्रकार → श्रेणी-I आणि श्रेणी-II
• श्रेणी-I साठी किमान ₹30 कोटी नफा आवश्यक
फायदे :
➫ श्रेणी-I कंपनी → ₹500 कोटीपर्यंत भांडवली खर्च अधिकार
➫ इतर कंपन्यांसोबत काम करण्याचा अधिकार
➫ कर्मचारी व्यवस्थापन अधिकार
➫ यंत्र इंडिया लिमिटेड → संरक्षण क्षेत्रातील DPSU


































