केंद्रीय मंत्रिमंडळ काय असतं ?
• अलीकडेच श्री.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली.
• पंडित जवाहरलाल नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती आहे.
• राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 72 सदस्य संख्या असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाला शपथ दिली.
• यात 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

Syllabus : भारताची राज्यघटना : पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ
• आजच्या टॉपिक मध्ये आपण पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ (PM and Council of Ministers) यांच्या संदर्भात परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची कलमे जी वारंवार परिक्षेत विचारले आहे त्यांची माहिती बघणार आहोत.
• टॉपिकच्या शेवटी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भारताची राज्यघटना : पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यावर विचारलेले प्रश्न बघणार आहोत.
मंत्रिमंडळ
• भारतीय संविधान कलम 74 मध्ये मंत्रिमंडळाचा उल्लेख दिसतो.
• कलम 74 (1) : राष्ट्रपतीस सहाय्यक व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल.
• कलम 75 मध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती, त्यांचे कार्यालय, जबाबदाऱ्या वेतन आणि भत्ते यासंदर्भात या कलमांमध्ये माहिती आहे.
• कलम 75(1A) : मंत्रिमंडळात एकूण मंत्र्यांची संख्या पंतप्रधानासहित लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असू नये अशी तरतूद आहे. ही तरतूद 91 वी घटनादुरुस्ती 2003 ने टाकण्यात आली.
• कलम 75(2) : नुसार वैयक्तिक मंत्री राष्ट्रपतीला जबाबदार असतात.
• कलम 75(3) : मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेस जबाबदार असते.
मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे स्वरूप :
मंत्रिमंडळात तीन प्रकारचे मंत्री असतात.
1. कॅबिनेट मंत्री
2. राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)
3. राज्यमंत्री
1) कॅबिनेट मंत्री :
• कॅबिनेट मंत्री हे मुख्यता पक्षाचे/युतीतील घटक पक्षांचे जेष्ठ नेते असतात.
• महत्त्वाचे मंत्रालय यांच्याकडे असतात.
• उदाहरणार्थ गृहमंत्रालय, अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय इत्यादी.
• यात 25 ते 30 मंत्री असतात.
• केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष पंतप्रधान असतात.
• मूळ घटनेत कॅबिनेट या शब्दाचा उल्लेखही नव्हता. 44 वी घटनादुरुस्ती 1978 द्वारे कलम 352 (3) मध्ये कॅबिनेट हा शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आला.

2) राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) :
• या मंत्र्यांकडे छोट्या मंत्रालयाचा कारभार दिला जातो.
• कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीस यांचा समावेश होत नाही परंतु आमंत्रण असल्यास राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीस भाग घेऊ शकतात.

3) राज्यमंत्री :
हे मंत्री कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यांच्या कारभारात मदत करतात.

• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात ?
(MPSC PSI 2012, SSC, NDA, महाराष्ट्र पोलीस भरती 2023,2019,...)
1. राष्ट्रपती
2. लोकसभा सभापती
3. पंतप्रधान
4. वित्तमंत्री
उत्तर : पंतप्रधान
प्रश्न ) कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केलेला आढळतो ?
(MPSC ESI 2017)
• कलम 74
• कलम 75
• कलम 352
• कलम 353
उत्तर : कलम 352
प्रश्न ) खालील विधानांवर विचार करा.
1. भारतीय संविधान कलम 74 मध्ये मंत्रिमंडळाचा उल्लेख केलेला आहे.
2. मंत्रिमंडळात एकूण मंत्र्यांची संख्या पंतप्रधानासहित लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असू नये.
3. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेस जबाबदार असते.
वरील विधानांपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/ आहेत.
1. फक्त 1
2. 1 आणि 2
3. 1 आणि 3
4. 1,2 आणि 3
उत्तर : 1,2 आणि 3
{Key Words : UPSC, MPSC, Maharashtra police Bharti, GS, polity,bhartachirajyaghatna, pantapradhan, PM and council of ministers, policebhartiprashn, current Affair, chalu Ghadamodi}
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇
2024 : फ्री टेस्ट
https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
जागतिक वन्य दिनाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
जागतिक वन्यजीव दिन | महाराष्ट्र वन विभागाने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड | देशातील बिबट्यांच्या संख्येत वाढ
https://www.tcs9.in/mr/current-affairs/jagtik-vanyjiv-din-or-3-march-or-maharashtra-vanvibhag-giniz-world-record-or-bhartmata-or-deshatil-bibtyanchya-sankhet-vaad
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.tcs9.in/mr
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.tcs9.in/mr
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://t.me/tcs9team
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
#polity
#chhatrapatishivajimaharajasthapradhanmandal
#Swarajya
#shivrajyabhishek2024
#history
#maharashtrachaetihas
#mpsc
#upsc
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff